त्रासाकडे दुर्लक्ष करणे पडले महागात;कशीश हत्याकांडाच्या 'क्राईम सीन' मधून अनेक बाबींचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 03:24 PM2022-05-28T15:24:13+5:302022-05-28T15:25:01+5:30

Kashish murder Case: महाविद्यालयीन विद्यार्थिनी कशीशचा २१ जून रोजी रचनाकार कॉलनीतील रिकाम्या प्लॉटमध्ये ओढत नेऊन शरणसिंग याने निर्घृणपणे खून केला होता.

Kashish murder Case: It was expensive to ignore the trouble; Police create 'crime scene' of Kashish's murder | त्रासाकडे दुर्लक्ष करणे पडले महागात;कशीश हत्याकांडाच्या 'क्राईम सीन' मधून अनेक बाबींचा उलगडा

त्रासाकडे दुर्लक्ष करणे पडले महागात;कशीश हत्याकांडाच्या 'क्राईम सीन' मधून अनेक बाबींचा उलगडा

googlenewsNext

औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थिनी सुखप्रीत कौर ऊर्फ कशीशच्या हत्येचा क्राईम सीन शहर पोलिसांनी शुक्रवारी तयार केला. यामध्ये आरोपी शरणसिंग सेठी याने घटनेच्या दिवशी सकाळपासून तिचा पाठलाग केलेल्या घटनाही चित्रित केल्या आहेत. दरम्यान, आरोपीची पोलीस कोठडी संपल्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी शरणसिंगला न्यायालयात हजर केले असता, त्यास २ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. कुऱ्हेकर यांनी दिले.

महाविद्यालयीन विद्यार्थिनी कशीशचा २१ जून रोजी रचनाकार कॉलनीतील रिकाम्या प्लॉटमध्ये ओढत नेऊन शरणसिंग याने निर्घृणपणे खून केला होता. त्यास गुन्हे शाखा पोलिसांनी २२ जून रोजी लासलगावात अटक केली. न्यायालयाने सुरुवातीला त्यास २७ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली. ही मुदत शुक्रवारी संपत असल्यामुळे तपास अधिकारी निरीक्षक अविनाश आघाव यांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी अधिक तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. ही मागणी न्यायाधीशांनी मान्य केली. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस आयुक्तांनी निरीक्षक आघाव यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना केली आहे. ही एसआयटी अतिशय वेगवान पद्धतीने आरोपीच्या विरोधातील पुरावे जमा करीत आहेत. निरीक्षक आघाव, सायबरचे निरीक्षक गौतम पातारे, उस्मानपुऱ्याच्या निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी शुक्रवारी घटनास्थळावर घटनेच्या दिवशी घडलेला सीन तयार केला. आरोपी कशीशच्या पाठीमागे एकतर्फी कसा लागलेला होता. त्याविषयी आरोपीला घेऊन चित्रण केले. याशिवाय गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके, पवन इंगळे, अमोल म्हस्के, अजित दगडखैर यांच्यासह वेदांतनगरचे उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे हे गुन्ह्यातील विविध पुरावे जोडण्यासाठी काम करीत आहेत.

१५ पेक्षा अधिक जबाब नोंदवले
तपास पथकांनी गुन्ह्याशी संबंधित असलेल्या १५ पेक्षा अधिकजणांचे जबाब नोंदवले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींनाही साक्षीदार करण्यात येणार आहे. तसेच आरोपीच्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून त्याची माहिती नोंदवली आहे.

आरोपीने हातावर गोंदवले नाव
आरोपी शरणसिंग याने एकतर्फी प्रेम करतानाच स्वत:च्या हातावर कशीश हे नाव गोंदवून घेतले होते. तसेच त्याने काही महिन्यांपूर्वी हातावर चाकूने वार करून कशीशला ब्लॅकमेल केल्याचेही समोर आले आहे.

दुर्लक्ष करणे पडले महागात
आरोपी कशीशला अनेक महिन्यांपासून त्रास देत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. घटनेच्या दिवशीही त्याने विविध ठिकाणी तिच्यासोबत वाद घातला. या सर्व घटनांकडे कशीशने दुर्लक्ष केल्यामुळे आरोपीची हिंमत अधिक वाढली. कशीश आपली होऊ शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तिचा खून केल्याचे चौकशीत समोर आले.

Web Title: Kashish murder Case: It was expensive to ignore the trouble; Police create 'crime scene' of Kashish's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.