‘…बऱ्याच काळानंतर’ आला कतरिनाचा खास व्हिडिओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:03 AM2021-01-16T04:03:57+5:302021-01-16T04:03:57+5:30
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री कतरिना कैफचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कतरिनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती डान्सची प्रॅक्टिस ...
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री कतरिना कैफचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कतरिनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती डान्सची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. मात्र, अचानक ही प्रॅक्टिस सोडून ती मस्तीच्या मूडमध्ये डान्स करते. ‘...आणि बऱ्याच काळानंतर, आम्ही डान्स करतोय’, असे कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले आहे. विशेष म्हणजे तिच्या या व्हिडिओवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. मात्र, या व्हिडिओतील गाणे म्यूट करण्यात आले आहे. त्यामुळे कदाचित कतरिना तिच्या आगामी चित्रपटासाठी ही डान्स प्रॅक्टिस करत असल्याचे म्हटले जात आहे. व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून आतापर्यंत याला २४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
टीव्हीवरील आईची इमेज बदलली पाहिजे
अभिनेत्री प्रिया मराठे ही नुकतीच झी युवावरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. प्रिया ही नचिकेतच्या आईच्या इराच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसत आहे. या अनुभवावर बोलताना प्रिया म्हणाली, ‘मला स्वतःला असं वाटतं की, टेलिव्हिजनवरील एका आईची इमेज ही बदलली पाहिजे. माझ्या वयाच्या असलेल्या आई जेव्हा मी खऱ्या आयुष्यात पाहते तर त्या मॉडर्न असतात, मॉडर्न कपडे घालतात, त्यांना सगळं ठाऊक असतं, त्यांचं वागणं फारसं खूप मोठ्या माणसांसारखं नसतं, त्यांना बघून त्या २० वर्षांच्या मुलाची आई वाटत नाहीत आणि अशीच आई मी पडद्यावर साकारतेय.’
तांडव वेबसिरीज अडकली वादाच्या भोवऱ्यात
पॉलिटिकल ड्रामा असलेली तांडव ही वेबसिरीज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही वेबसिरीज काहींना आवडत आहे, तर काहींच्या मते या वेबसिरीजद्वारे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मोहम्मद जीशान अयूब याच्यावर चित्रित एका दृश्यावरून वाद रंगला आहे. या दृश्यामुळे हिंदू देवदेवतांचा अपमान झाला असल्याचा आरोप करत निर्मात्यांनी लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी सोशल मीडियाद्वारे केली जात आहे. तसेच या विरोधात हॅशटॅग मोहीमसुद्धा सुरू झाली आहे. वेबसिरीज अली अब्बास जाफरने दिग्दर्शित केली असून यात सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर यांच्या मुख्य भूमिका आहेत.