अत्यावश्यक सेवेतील दुकाने दिवसआड बंद ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:02 AM2021-04-28T04:02:57+5:302021-04-28T04:02:57+5:30
शेकटा : गावात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवेतील दुकाने एक दिवस आड बंद ठेवण्याचा निर्णय शेकटा ग्रामपंचायतीने ...
शेकटा : गावात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवेतील दुकाने एक दिवस आड बंद ठेवण्याचा निर्णय शेकटा ग्रामपंचायतीने घेतला आहे. या निर्णयाला दुकानदारांनी देखील प्रतिसाद दिला आहे.
राज्यात १४ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील आस्थापना वगळून सर्वच आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेकटा गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रवेश केला असून सद्य:स्थितीत गावातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामपंचायतीने सोमवारी बैठक घेऊन अत्यावश्यक सेवेतील दुकाने देखील एक दिवसआड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, तर शनिवारी, रविवारी पूर्णपणे कडक निर्बंध घालून दिले. येथील १४८ दुकानदारांना पत्र देण्यात आले असून दुकानदारांनी देखील त्याला प्रतिसाद दिला आहे.