१० वी, १२ वी परीक्षेसाठी ऑनलाईन पर्याय ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:06 AM2021-03-25T04:06:02+5:302021-03-25T04:06:02+5:30

कोरोनाच्या बाबतीत सध्या महाराष्ट्राची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांची वाढत जाणारी आकडेवारी ...

Keep online options for 10th, 12th exams | १० वी, १२ वी परीक्षेसाठी ऑनलाईन पर्याय ठेवा

१० वी, १२ वी परीक्षेसाठी ऑनलाईन पर्याय ठेवा

googlenewsNext

कोरोनाच्या बाबतीत सध्या महाराष्ट्राची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांची वाढत जाणारी आकडेवारी धडकी भरविणारी आहे.

दहावी- बारावीची परीक्षा ही कमीतकमी ६ ते ८ दिवस चालणारी असते. याकाळात विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र येणार, एकमेकांशी संवाद साधणार आणि घर ते परीक्षा केंद्र असा प्रवासही करणार. या सगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल, त्यांच्यासाठी तरी शासनाने ऑनलाईनचा पर्याय द्यावा, अशी मागणी काही पालक करत आहेत.

चौकट :

ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा सगळ्या विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असू शकत नाहीत. ग्रामीण भागात तर परिस्थिती आणखीनच अवघड आहे. या सगळ्याचा विचार करून शासनाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या काळात कोरोना संसर्गामुळे ऑफलाईन परीक्षेच्या दृष्टीने अनेक धोके आहेत, पण तांत्रिक अडचणी आल्या तर ऑनलाईन परीक्षाही धोक्याची ठरू शकते. शिवाय ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थी कॉप्या करू शकण्याची शक्यताही जास्त आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाईन घ्या की ऑफलाईन, संभाव्य धोके सगळ्याच ठिकाणी आहेत.

- एस. पी. जवळकर

शिक्षणतज्ज्ञ

Web Title: Keep online options for 10th, 12th exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.