पिढ्या घडवणारी चाकोरीबाहेरील गुरुकिल्ली !

By Admin | Published: September 5, 2016 12:33 AM2016-09-05T00:33:02+5:302016-09-05T01:03:45+5:30

बीड : आज शिक्षक दिन..! गुरुंविषयी आदर व्यक्त करण्याचा दिवस. यंदा लाडक्या बाप्पांचेही याच मुहूर्तावर आगमन होत आहे. बाप्पांनाही सृजनांचे मूर्तिमंत रुप मानले जाते.

The key to generation beyond the chakra! | पिढ्या घडवणारी चाकोरीबाहेरील गुरुकिल्ली !

पिढ्या घडवणारी चाकोरीबाहेरील गुरुकिल्ली !

googlenewsNext


बीड : आज शिक्षक दिन..! गुरुंविषयी आदर व्यक्त करण्याचा दिवस. यंदा लाडक्या बाप्पांचेही याच मुहूर्तावर आगमन होत आहे. बाप्पांनाही सृजनांचे मूर्तिमंत रुप मानले जाते. त्यामुळे हा तसा दुर्मिळ योगच! शिक्षणाच्या बाजारीकरणात ज्ञानदानाचे पवित्र काम निष्ठेने करणाऱ्यांचीही कमी नाही. वेतन आयोग... पगाराचे फुगलेले आकडे... चौकोनी कुटुंब व सुखवस्तू जगण्याच्या स्पर्धेत काही शिक्षकांनी सामाजिक जाणिवेचा पाझर जिवंत ठेवला. याचे पुरस्कारासाठी कधी भांडवल केले नाही की कौतुकाची अपेक्षाही मनी बाळगली नाही. आदर्श शिक्षकाची व्याख्या त्यांच्या कार्याचा पट उघडल्यावरच कळते. विद्यार्थ्यांच्या मनावर केवळ पुस्तकी ज्ञान न बिंबवता त्यांना माणूस म्हणून जगण्याचे गणित शिकवले व ग्रामीण भागात राहूनही चाकोरीबाहेर जाऊन ज्ञानदान करता येते हे सिद्ध केले..
अशा मुलखावेगळ्या शिल्पकारांचा हा धांडोळा...ड
शहराच्या पेठबीड भागातील रयत शिक्षण संस्थेच्या कनकालेश्वर प्राथमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सुमित्रा बाबूराव काळे यांनी वंचित व उपेक्षितांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या शाळेपर्यंतच्या प्रवासाचा खर्च उचलून त्यांनी शिक्षणाची वाट सुलभ केली आहे.
झोपडपट्टी भागात ही शाळा आहे. पटावरील विद्यार्थ्यांची यादी पाहिली तर पालकांचे उत्पन्न वर्षाकाठी अत्यल्प म्हणावे लागेल. ज्यांना खाण्याचीच भ्रांत आहे, अशा पालकांचे आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणे साहजिकच; मात्र सुमित्रा काळे यांनी घरोघर जाऊन पालकांचे समुपदेशन केले. कसेबसे पालक मुलांच्या शिक्षणासाठी तयार झाले. त्यानंतर मुलांना शाळेत पाठवायचे कसे, हा प्रश्न उभा राहिला. ही मुले शिकावीत, या उमेदीने सुमित्रा काळे यांनी त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा प्रवास खर्च उचलण्याची जबाबदारी पत्करली.
आजघडीला त्या १० विद्यार्थ्यांचा घरापासून शाळेपर्यंतचा रिक्षा भाडे खर्च आपल्या पगारातून करतात. शाळेच्या इमारतीसाठी वर्गणी गोळा करायचे ठरले तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता १ लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, शुल्क यासारख्या मदतीसाठी त्या सदैव तत्पर असतात. साधन आहे.
या माध्यमातून राष्ट्राला विकासाच्या गतीकडे नेण्याची किमया साध्य होते. अंबाजोगाईसारख्या ग्रामीण भागातील मुला-मुलींना उच्च तंत्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी अंबाजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी यांचे मोलाचे योगदान आहे.
मराठवाड्यात शिक्षणाची पंढरी संबोधल्या जाणाऱ्या अंबाजोगाईत १९८३ पर्यंत अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणाची सोय नव्हती. ही गरज ओळखून लातूर येथील महात्मा बसवेश्वर संस्थेने रविवार पेठेतील शंभुलिंग महाराजांच्या मठात पत्र्याच्या शेडमध्ये पॉलिटेक्निक हा अभ्यास सुरू केला व तंत्रशिक्षणाचे नवे दालन अंबाजोगाईत सुरू झाले. याच कालावधीत बी.आय. खडकभावी या कॉलेजचे प्राचार्य म्हणून रुजू झाले. प्रारंभी सुरू झालेल्या या नवीन पॉलिटेक्निकसाठी विद्यार्थी मिळविणे जिकिरीचे होते. कुठल्याही शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसताना या कॉलेजची सुरुवात झाली. शिक्षणाच्या पंढरीत या कॉलेजने हळूहळू आपले स्थान निर्माण केले. पॉलिटेक्निकनंतर १९९३ मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. हा खडतर प्रवास बी.आय. खडकभावी यांनी मोठ्या परिश्रमाने पार केला. महाविद्यालयाच्या उभारणीत व जडणघडणीत बी.आय. खडकभावी यांचा सिंहाचा वाटा आहे. विद्यार्थीप्रिय म्हणूनही त्यांना ओळखले जाते.

Web Title: The key to generation beyond the chakra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.