खैरेंनी दुस-यांच्या नावे शेंगा खाऊ नयेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:30 AM2017-12-18T01:30:29+5:302017-12-18T01:30:47+5:30

शहराचे ‘औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर’ असे नामकरण करण्यावरून शिवसेनेतच जुंपली आहे. खा.चंद्रकांत खैैरेंनी दुसºयांच्या नावे शेंगा खाण्यापेक्षा स्वत: काय करतात ते पाहावे. शिवसेनेचे सर्व मंत्री नालायक आणि ते एकटेच लायक आहेत, असा टोला पालकमंत्री तथा शिवसेना मराठवाडा नेते रामदास कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.

 Khaireni should not eat beans after the other | खैरेंनी दुस-यांच्या नावे शेंगा खाऊ नयेत

खैरेंनी दुस-यांच्या नावे शेंगा खाऊ नयेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहराचे ‘औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर’ असे नामकरण करण्यावरून शिवसेनेतच जुंपली आहे. खा.चंद्रकांत खैैरेंनी दुसºयांच्या नावे शेंगा खाण्यापेक्षा स्वत: काय करतात ते पाहावे. शिवसेनेचे सर्व मंत्री नालायक आणि ते एकटेच लायक आहेत, असा टोला पालकमंत्री तथा शिवसेना मराठवाडा नेते रामदास कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.
दोन दिवसांपूर्वी खा.चंद्रकांत खैरे यांनी पालकमंत्री रामदास कदम यांच्यासह शिवसेनेतील सर्व मंत्र्यांवर शहराचे नाव संभाजीनगर करण्याप्रकरणी खापर फोडले होते.   
पालकमंत्र्यांचा दौरा गुप्त
पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा गुप्त होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कदम शहरात येऊन गेले हे खैरेंच्या निकटवर्तीयांना माहितीही नव्हते. त्यामुळे पालकमंत्री कदम काय बोलले याची माहिती खैरे गटांकडून घेण्यात येत होती.
नामांतरासाठी शिवसेनेची निदर्शने
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने रविवारी सकाळी टी. व्ही. सेंटर हडको येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर खा. चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, नगरसेवक राजू वैद्य, सचिन खैरे, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकाºयांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. या निदर्शनाला जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे गैरहजर होते.
४‘संभाजीनगर हवे की औरंगाबाद’ या शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या घोषणेला मे २०१८ मध्ये ३० वर्षे पूर्ण होतील. दरम्यान १९९५ ते १९९९ हे साडेचार वर्षे राज्यात, १९९९ ते २००४ हे पाच वर्षे केंद्रात आणि मागील तीन वर्षांपासून केंद्रात व राज्यात शिवसेना सत्तेत आहे. आजवर ३० पैकी साडेबारा वर्षे सेना सत्तेत असतानाही नामकरणाचा मुद्दा राजकीय मुद्दा बनूनच राहिला. दरम्यान सोशल मीडियावर शिवसेनेच्या या भूमिकेवरून जोरदार मॅसेजवॉर सुरू झाले आहे. याचा फटका कुणाला बसतो हे आगामी काळात पाहणे लक्षणीय राहील.
शिवसेना हिंदुत्ववादी
कुठे राहिली
शिवसेनाप्रमुखांच्या विचाराशी निगडित हिंदुत्ववादी शिवसेना आता राहिली नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केला. डॉ. कराड म्हणाले, जर हिंदुवाद कायम असता, तर जि.प. निवडणुकीत भाजपबरोबर सेनेने युती केली असती. फुलंब्रीत पक्षचिन्ह,भगवे उपरणे बाजूला ठेवून काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन शिवसेना नेत्यांनी प्रचार केला. लोकसभा निवडणुका जशा जवळ येतील, त्यानुसार शिवसेना ‘संभाजीनगर’ नामकरणाचा मुद्दा उकरून काढते. १९९९ ला शिवसेनाप्रमुखांनी फक्त काँग्रेसचा महापौर होऊ नये, म्हणून सेनेचे नगरसेवक जास्त असताना हिंदुत्वासाठी महापौरपदी माझी वर्णी लावली होती. आताची शिवसेना तसा निर्णय घेणे शक्य नसल्याचे अलीकडच्या राजकारणावरून दिसते आहे. कारण शिवसेनेने सत्तेसाठी काँग्रेसशी घरोबा केला आहे. संभाजीनगर नामकरण ही शिवसेनेची नौटंकी राजकारणापुरती आहे. सर्व शिवपे्रमी जनतेला हे समजले आहे.

Web Title:  Khaireni should not eat beans after the other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.