खैरेंनीही टेकले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:58 PM2018-02-24T23:58:17+5:302018-02-24T23:58:35+5:30

मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी बनून आलेले पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी नारेगाव येथील आंदोलकांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर लगेच दुसºया दिवशी खा. चंद्रकांत खैरे मनपा पदाधिका-यांसोबत नारेगावात आंदोलकांसोबत चर्चेला गेले. आंदोलकांनी खैरे यांनाही जुमानले नाही. आंदोलकांचा रौद्र अवतार पाहून लोकप्रतिनिधींना काढता पाय घ्यावा लागला.

Khairenni tekhe hand | खैरेंनीही टेकले हात

खैरेंनीही टेकले हात

googlenewsNext
ठळक मुद्देनारेगाव : आंदोलकांसोबत शनिवारीही झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी बनून आलेले पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी नारेगाव येथील आंदोलकांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर लगेच दुसºया दिवशी खा. चंद्रकांत खैरे मनपा पदाधिका-यांसोबत नारेगावात आंदोलकांसोबत चर्चेला गेले. आंदोलकांनी खैरे यांनाही जुमानले नाही. आंदोलकांचा रौद्र अवतार पाहून लोकप्रतिनिधींना काढता पाय घ्यावा लागला.
नारेगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी १६ फेब्रुवारीपासून कचरा डेपो हटाव या मुख्य मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी आंदोलनाचा नववा दिवस होता, मात्र कचºयाची कोंडी फुटलेली नाही. शुक्रवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनीही शिष्टाई केली. त्यांनाही यश आले नाही. शनिवारी दुपारी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, सभागृह नेते विकास जैन, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी आंदोलकांची भेट घेतली.
यावेळी पुन्हा एकदा तीन महिन्यांचा वेळ द्या, डेपोतील कचºयावर प्रक्रिया करून या ठिकाणी मोकळे मैदान करू, अशी भूमिका खैरे यांनी मांडली; मात्र त्याला नागरिक, युवक, महिलांनी कडाडून विरोध केला.
शहरात दहा दिवस कचरा साचला तर तो तुम्हाला सहन होत नाही, आम्ही चाळीस वर्षांपासून त्रास सहन करीत आहोत, याचा विचार करा, अशा शब्दांत नागरिकांनी खैैरे यांना सुनावले. तीन-चार महिने सोडा, चार दिवसदेखील कचरा येऊ दिला जाणार नाही, असा इशारा दिला.
तीस मिनिटे कचरा
डेपोत थांबून दाखवा
शहराचा कचरा आम्ही तीस-चाळीस वर्षे सहन केला. तुम्ही आम्हाला तीस मिनिटे कचरा डेपोमध्ये उभे राहून दाखवा, असे खडे बोल नागरिकांनी यावेळी सुनावले. औरंगाबाद जिल्ह्यात तुम्हाला एवढीच जागा आहे का? एसी गाड्यांतून तुम्ही येता, आमचा त्रास काय कळणार? अशा प्रकारे युवकांनी आपला रोष व्यक्त केला.
तुम्ही मला ओळखले नाही...
आंदोलकांची बाजू मांडण्यासाठी एका महिलेने पुढाकार घेतला. पदाधिकाºयासमोर त्या बसल्या. त्यांनी खैरे कोणते? असा प्रश्न केला. त्यावर एकच हशा पिकला. खैरे यांनी लगेच ‘तुम्ही मला कसे काय ओळखले नाही,’ असे म्हणून स्वत:ची ओळख करून दिली.

Web Title: Khairenni tekhe hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.