'खंडोबा' उजळले सूर्यकिरणांनी, वैशाखी पौर्णिमेपर्यंत होणार सूर्यप्रकाश दर्शन
By साहेबराव हिवराळे | Published: April 24, 2023 09:50 PM2023-04-24T21:50:33+5:302023-04-24T21:51:51+5:30
निसर्गाच्या या किमयाला पाहण्यासाठी मंदिरात खंडोबा भक्तांची गर्दी पहाटे होत आहे.
छत्रपती संभाजीनगर: येथील खंडोबा मंदिरातील गाभारा सूर्यकिरणाने प्रकाशमय होत असून, खंडोबा मुर्ती तेजाने उजाळून दिसत आहे. निसर्गाच्या या किमयाला पाहण्यासाठी मंदिरात खंडोबा भक्तांची गर्दी पहाटे होत आहे.
सोमवारी सकाळी ८.४५ मिनीटाला मंदिराच्या वर गाभारात असलेल्या खिडकीतून सूर्यप्रकाश डोकावतो आणि तो अर्धातास हळूहळु मंदिरात प्रकाश देत राहतो. कवडसा पडलेलेली किरणे हळूहळू खंडोबा मुर्तीवर पडते त्यावेळी संपूर्ण मंदिर प्रकाशमय होत आहे. हा सूर्यकिरणाचा खेळ वैशाखी पौर्णिमेपर्यंत निरंतर सुरू राहतो, दरवर्षी चैत्र किंवा वैशाख महिन्यात हे सूर्यदर्शन भाविकांना पाहण्यास मिळते.
हेमांडपंथी मंदिर निर्माण प्रसंगी स्थापत्यकलेचा हा नमुनाच असल्याचेही स्थापत्य अधिकाऱ्यांचेही मत आहे. सूर्यदर्शन तर दररोजच आपल्याला होते परंतु वीज प्रकाश नसताना सूर्यदर्शन हे भाविकांसाठी एक पर्वणीच ठरत आहे. असे ट्रस्टी अध्यक्ष साहेबराव पळसकर तसेच पुजारी धुमाळ कुटुंबियाचे म्हणणे आहे.