खंडोबा मंदिराकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:01 AM2017-09-11T01:01:49+5:302017-09-11T01:01:49+5:30
सातारा खंडोबा मंदिरावर वाढलेली झाडे-झुडपे काढण्यास पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केले आहे; परंतु अखेर ट्रस्टने जोखीम पत्करून ती धोकादायक ठरणारी झाडे काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औैरंगाबाद : सातारा खंडोबा मंदिरावर वाढलेली झाडे-झुडपे काढण्यास पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केले आहे; परंतु अखेर ट्रस्टने जोखीम पत्करून ती धोकादायक ठरणारी झाडे
काढली.
सातारा खंडोबा मंदिरात गतवर्षी पावसाने दीपमाळीचा खण झिजून पडला होता. त्याच्या देखभालीला थातुरमातुर मुलामा लावून गेल्यावर पुन्हा या मंदिराच्या देखभालीकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. मंदिरासाठी आलेला १ कोटी १३ लाखांच्या निधीचा काय उपयोग केला, असे जर कुणी विचारले असता टेंडर मागविले, त्यावर पुढील प्रक्रिया होईल, असे उत्तर नेहमीचेच
आहे.
ट्रस्टीने पुरातत्व विभागाच्या अधिकाºयांना सांगितले की, मंदिरावर झाडे-झुडपांची वाढ झाली आहे. त्यामुळे मंदिराला धोका होऊ शकतो; परंतु अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर मंदिर ट्रस्टीनेच जोखीम पत्करून देवळावरील धोकादायक झाडे-झुडपे काढून परिसर स्वच्छ केला.
रविवारी मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते, काही अप्रिय घटना टळाव्यात यासाठी शुुक्रवार आणि शनिवारी मंदिरावरील झाडे-झुडपे काढली.
पुरातन काळातील हेमाडपंती खंडोबा मंदिर ऐतिहासिक वास्तू जतन करण्याची जबाबदारी पुरातत्व विभागावर आहे. ट्रस्टने आम्हाला विचारल्याशिवाय काहीही बदल करू नये, ती जबाबदारी विभागाची आहे, असे सांगितले जाते; परंतु त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्याचा विसर विभागाला पडलेला दिसत
आहे.
वास्तूचे जतन करण्यासाठी अधिकाºयांची धडपड दिसत नाही; परंतु ट्रस्टीसोबत अनेकदा अधिकाºयांचे खटके उडण्याचे प्रकार अनेकदा घडतात.