कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:05 AM2021-05-25T04:05:51+5:302021-05-25T04:05:51+5:30
खरीप बियाण्यांची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांना पूर्ण माहिती मिळावी म्हणू कृषी विभागाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले ...
खरीप बियाण्यांची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांना पूर्ण माहिती मिळावी म्हणू कृषी विभागाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. सांजूळ येथे कपाशी, मका, बाजरी, तूर, ऊस, सोयाबीन या खरीप पिकांच्या लागवडपासून काढणीपर्यंत कशा प्रकारे देखभाल करायची यावर मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी माती परीक्षणाआधारे खतांचा वापर, रासायनिक खतांसोबत शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळींची खते यांचा वापर करणे व बियाण्यास पेरणीपूर्वी ॲझिटोबॅक्टर, रायझोबियम पीएसबी यांची बीजप्रक्रिया केल्यास जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश या अन्नद्र्व्यांची कमतरता भरून काढता येते. युरिया खत करताना निम कोटेड, झिंक कोटेड वापरावे असे कृषी सहायक रामभाऊ सोळुंके यांनी सांगितले. यावेळी कृषी पर्यवेक्षक नामदेव जिंदे, उपसरपंच कमलबाई योगेश्वर जाधव, राजेंद्र सांगळे, संजय जाधव, भगवानराव जाधव, पंढरीनाथ जाधव, खंडेराव जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : सांजूळ येथे शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया करून दाखविताना कृषी अधिकारी व कर्मचारी.
240521\saanjul bij_1.jpg
सांजूळ येथे आयोजित शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया करून दाखविताना कृषी अधिकारी व कर्मचारी.