पाथ्री येथे शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:05 AM2021-05-31T04:05:46+5:302021-05-31T04:05:46+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर होते. खरीप पिकाची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाची माहिती व्हावी, लागवड पासून काढणी ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर होते.
खरीप पिकाची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाची माहिती व्हावी, लागवड पासून काढणी पर्यंत संपूर्ण माहिती मिळाली तर पिकाची देखभाल योग्य रीतीने होईल तसेच उत्पादन वाढण्यास मदत होईल, म्हणून कृषी विभाग गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना माहिती देत आहे. सोयाबीन, तूर बियाण्याची उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. जमीन सुपीकता निर्देशांकानुसार रासायनिक खतांचा वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी काकासाहेब इंगळे यांनी केले. यावेळी सरपंच महेंद्र पाथ्रीकर, कृषी पर्यवेक्षक राधाकिसन मानकापे, चंद्रशेखर काकडे, सुधाकर बन्सोड, चंद्रकांत शिंदे उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :
पाथ्री येथे शेतकऱ्यांना खरीप पिकांविषयी प्रशिक्षण देताना कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी.