कृषी विभागाची खरीप हंगाम पूर्व बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 10:04 PM2019-05-26T22:04:19+5:302019-05-26T22:04:26+5:30
औरंगाबाद तालुक्यातील शेंद्रा कमंगर व वरुड काजी येथे कृषी विभागामार्फत खरीप हंगाम पूर्व बैठक पार पडली.
शेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील शेंद्रा कमंगर व वरुड काजी येथे कृषी विभागामार्फत खरीप हंगाम पूर्व बैठक पार पडली. कृषी साहाय्यक एस. जी. मिर्झा यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. बैठकीला शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
खरीप हंगामाच्या तयारीसाठी कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद तालुक्यातील शेंद्रा कमंगर व वरुड काजी येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत कृषी सहाय्यक सायराबानो मिर्झा यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले.
यावेळी शेतकऱ्यांना मका वरील अळीचे व शेंद्रिय बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करणे, खते व बीबीयाने खरेदी करताना व कीटक नाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी आणि एम.आर.ई.जी.एसच्या मंजूर कामांविषयी माहिती दिली. शिवाय लिंबोळी वेचून अर्क तयार करणे, पेरणी पूर्वी बीज प्रकिया आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी शेंद्रा येथे सरपंच शुभांगी तांबे, उपसरपंच पांडुरंग कचकुरे, ग्रामसेवक हरिदास पाखरे, जनार्धन कचकुरे, ज्ञानेश्वर कचकुरे, सुखदेव मुळे, महेश कचकुरे, राजेंद्र काकडे, भास्कर कचकुरे, रवींद्र तांबे आदींसह मोठ्या प्रमाणात महिला व शेतकरी उपस्थित होते.