खुनातील आरोपी पंधरा वर्षानंतर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:42 AM2017-07-26T00:42:38+5:302017-07-26T00:42:38+5:30
बीड : मेहुण्याचा खून करून फरार झालेल्या मुकींदा पिराजी चव्हाण (रा.टाकरवण) याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी सायंकाळी मुसक्या आवळल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मेहुण्याचा खून करून फरार झालेल्या मुकींदा पिराजी चव्हाण (रा.टाकरवण) याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी सायंकाळी मुसक्या आवळल्या. ही कारवाई माजलगाव तालुक्यातील वारोळा तांडा येथे करण्यात आली.
दगडू पवार (रा.वारोळा तांडा) याचा १० आॅगस्ट २००२ साली बीड तालुक्यातील नाथापूर शिवारात खून करण्यात आला होता. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दगडू पवारे हे वारंवार मारहाण करायचे. बहिणीला होणार त्रास मुकिंदाला सहन झाला नाही. त्यामुळे त्याने पवार यांचा काटा काढला होता. मेहुण्याचा खून करून तो फरार झाला होता. कर्नाटक राज्यात तो काही दिवस होता. तेथून तो पुन्हा बीडमध्ये आला.
ठिकठिकाणी तो मजूरी करून पोट भरायचा. पोलीस येणार असल्याची कुणकुण लागताच तो पुन्हा फरार व्हायचा. मंगळवारी तो वारोळा तांडा येथे एका बांधकामावर काम करीत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यांनी सापळा रचून मुकिंदाच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे, शेख जुबेर, राहुल डोळस, अशोक हंबरडे, सखाराम सारूक, भागवत बिक्कड यांनी केली.