हनुमान जन्मोत्सव सोहळ्यासाठी खुलताबाद, गवळीशिवरा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:34 AM2018-03-31T00:34:24+5:302018-03-31T00:35:21+5:30
खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारूती संस्थान व लासूर स्टेशनजवळील गवळी शिवरा येथील प्रसिद्ध महारुद्र मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून शनिवारी येणाऱ्या भाविकांसाठी ही देवस्थाने सज्ज झाली आहेत. या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची महापूजा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
खुलताबाद/लासूर स्टेशन : खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारूती संस्थान व लासूर स्टेशनजवळील गवळी शिवरा येथील प्रसिद्ध महारुद्र मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून शनिवारी येणाऱ्या भाविकांसाठी ही देवस्थाने सज्ज झाली आहेत. या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची महापूजा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
भद्रा मारुती मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला या मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली असून शनिवारी सकाळी जन्मोत्सवासाठी व महाआरतीच्या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून शुक्रवारी रात्रीच भाविक पायी चालत निघाले आहेत.
गवळी शिवरा येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे, आ. प्रशांत बंब, शिवसेना नेते प्रशांत बनसोड,पंचायत समिती सदस्या सविता सुनिल केरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर राहणार आहे. शिवाय तगडा पोलीस बंदोबस्त, स्वयंसेवक उपलब्ध राहणार आहेत. ह.भ.प. मारुती महाराज झिरपे यांचे सकाळी ९ ते ११ या वेळेत जाहीर कीर्तन होणार असून त्यांनतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. रविवारी रुद्राभिषेक संपन्न होणार आहे. सरपंच अशोक फाळके, माजी पं.स. सदस्य चंद्रकांत गवळी, बाळासाहेब केरे, पोपट केरे, पोलीस पाटील बद्रीनाथ केरे, संस्थानचे अध्यक्ष रंगनाथ गवळी, अंबादास केरे, मारुती गवळी, पांडुरंग गवळी, संताराम केरे, उत्तम मांडे, गंगाधर फाळके, पांडे, सुभाष केरे, सुखदेव गवळी, नागेश पोळ, गणेश गवळी आदींसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.