भिन्न रक्तगट असूनही किडनी प्रत्यारोपण यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:04 PM2019-04-24T23:04:30+5:302019-04-24T23:05:13+5:30

जुळत्या रक्तगटाच्या नातेवाईकांची किडनी रुग्णास प्रत्यारोपित करणे, ही एक नियमित बाब आहे. परंतु दात्याचा रक्तगट रुग्णाशी जुळत नसतानाही विशिष्ट उपचार पद्धतीने दुर्मिळ अशी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये यशस्वी करण्यात आली.

Kidney transplant successful despite different blood groups | भिन्न रक्तगट असूनही किडनी प्रत्यारोपण यशस्वी

भिन्न रक्तगट असूनही किडनी प्रत्यारोपण यशस्वी

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाड्यात पहिलेच प्रत्यारोपण : युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये दुर्मिळ शस्त्रक्रिया


औरंगाबाद : जुळत्या रक्तगटाच्या नातेवाईकांची किडनी रुग्णास प्रत्यारोपित करणे, ही एक नियमित बाब आहे. परंतु दात्याचा रक्तगट रुग्णाशी जुळत नसतानाही विशिष्ट उपचार पद्धतीने दुर्मिळ अशी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये यशस्वी करण्यात आली.
मधुमेह व किडनीविकार जडलेला ५८ वर्षीय रुग्ण गेल्या कित्येक दिवसांपासून डायलिसिसचा उपचार घेत होता. रुग्णाची पत्नी ही एकमेव किडनी दाता म्हणून उपलब्ध होती. परंतु रुग्णाचा रक्तगट ‘ओ ’ आणि दात्याचा रक्तगट ‘बी’ असल्याने प्रत्यारोपण शक्य नव्हते. परंतु सिग्मा हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी उपलब्ध दात्याची किडनी प्रत्यारोपण करण्याचे आव्हान स्वीकारले.
प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ९ एप्रिल रोजी यशस्वीपणे पूर्ण झाली. रक्तगट जुळत नसताना केलेले मराठवाड्यातील हे पहिलेच किडनी प्रत्यारोपण ठरले आहे. या शस्त्रक्रियेतून मराठवाड्याच्या प्रत्यारोपणाच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला जाईल, असे डॉ. मनीषा टाकळकर आणि डॉ. उन्मेष टाकळकर यांनी म्हटले. अशा प्रकारच्या प्रत्यारोपणामुळे कित्येक किडनी रुग्णांना एक नवसंजीवनी प्राप्त होईल, असे मत किडनी प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. सचिन सोनी व डॉ. श्रीगणेश बरनेला यांनी व्यक्त केले.
शस्त्रक्रिया करणारे डॉक्टरांचे पथक
शहरामध्ये पहिले अवयवदान व प्रत्यारोपण सिग्मा हॉस्पिटलमध्ये झाले. त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात अवयवदानाची चळवळ वाढली. किडनी प्रत्यारोपणाची ही दुर्मिळ शस्त्रक्रिया करणाऱ्या पथकात डॉ. अभय महाजन, डॉ.अरुण चिंचोले, डॉ. श्रीगणेश बरनेला, डॉ.सचिन सोनी, डॉ. उमेश कुलकर्णी, डॉ. बालाजी आसेगावकर, डॉ. अजय रोटे यांचा सहभाग होता.

Web Title: Kidney transplant successful despite different blood groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.