'गर्लफ्रेंडसाठी त्याचा गेम केला'; एकतर्फी प्रेमातून जीवलग मित्राचा खून करणाऱ्याला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 03:27 PM2022-04-09T15:27:53+5:302022-04-09T15:28:59+5:30

मित्राच्या गर्लफ्रेंडवरील एकतर्फी प्रेमातून केला खून

‘killed him for his girlfriend’; Life imprisonment for the murderer of a close friend out of one sided love | 'गर्लफ्रेंडसाठी त्याचा गेम केला'; एकतर्फी प्रेमातून जीवलग मित्राचा खून करणाऱ्याला जन्मठेप

'गर्लफ्रेंडसाठी त्याचा गेम केला'; एकतर्फी प्रेमातून जीवलग मित्राचा खून करणाऱ्याला जन्मठेप

googlenewsNext

औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून जीवलग मित्र अजय शत्रुघ्न तिडके याचा गळा आवळून खून केल्याच्या आरोपाखाली मंगेश सुदाम वायवळ (रा. समसापूर, ता. परभणी) याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. रामगडिया यांनी जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम मयताचे वडील तथा फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशात म्हटले आहे.

मयत अजय तिडके (रा. शहापूर, ता. खामगाव, जि. बुलडाणा) याचे वडील शत्रुघ्न तिडके यांनी फिर्याद दिली होती की, अजय आणि मंगेश नोव्हेंबर २०१७पासून सोबत राहात होते. एनएसएसच्या कॅम्पदरम्यान अजयची एका तरुणीशी ओळख झाली होती. त्यातून त्यांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली होती. मंगेश जीवलग मित्र असल्याने अजय त्याच्यासोबत प्रत्येक माहितीची देवाण-घेवाण करत असे. अजयच्या प्रेयसीवर मंगेशचे एकतर्फी प्रेम जडले होते.

घटनेच्या काही महिन्यांपूर्वी मंगेश पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी गेला होता. ३१ मार्च २०१८ रोजी मंगेश पुण्याहून शहरात आला. ३ एप्रिल २०१८ रोजी तो अजय राहात असलेल्या रामेश्वर बिल्डींगमध्ये मुक्कामासाठी गेला. ४ एप्रिल २०१८ रोजी भीमजयंती उत्सवानिमित्त विद्यापीठात गायनाच्या कार्यक्रमासाठी अजय हा रुम पार्टनर अनिल भोजने आणि सचिन वानखेडे यांच्यासोबत गेला, तर मंगेश अजयच्या रुमवर झोपला होता.

गळा आवळून खून
रात्री ११:३०च्या सुमारास अजय व त्याचे रुमपार्टनर रुमवर आले. आपल्याला अजयशी खासगी बोलायचे आहे, असे बोलून मंगेशने सचिन आणि अनिल यांना दुसऱ्या रुममध्ये जाण्यास सांगितले. त्यामुळे ते दोघे दुसऱ्या रुममध्ये झोपी गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे मंगेशने सचिन आणि अनिल यांना उठवून, प्रेमात अडसर ठरत असल्याने आपण अजयचा गळा आवळून गेम केल्याचे सांगितले. आपण पोलीस ठाण्यात जात असल्याचे सांगून मंगेश तेथून निघून गेला. याबाबत बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुनावणी व शिक्षा
तपासाअंती पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी लोकअभियोक्ता अजित अंकुश यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी मंगेशला दोषी ठरवून भादंवि कलम ३०२ अन्वये वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला.

Web Title: ‘killed him for his girlfriend’; Life imprisonment for the murderer of a close friend out of one sided love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.