औरंगाबाद शहरात कचरा जाळण्याचे प्रकार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:38 AM2018-03-01T00:38:26+5:302018-03-01T00:40:34+5:30

चौदा दिवस उलटले तरी महापालिका कचरा कोंडीचा प्रश्न सोडवू शकली नाही. त्यामुळे शहरातील त्रस्त नागरिकांनी ठिकठिकाणी पडलेल्या कच-याला आग लावली. त्यामुळे दिवसभर शहरातील विविध भागांत धुराचे लोट दिसून येत होते. धुरामुळे आसपासच्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. कचºयाला आग लावण्याच्या या दळभद्री प्रकारामुळे विशेषत: दम्याच्या रुग्णांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.

The kind of garbage burning started in Aurangabad city | औरंगाबाद शहरात कचरा जाळण्याचे प्रकार सुरू

औरंगाबाद शहरात कचरा जाळण्याचे प्रकार सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देधुराचे लोट : त्रस्त झालेल्या नागरिकांचा मनपाविरुद्ध संताप; दुर्गंधीनेही जनता त्रस्त


लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चौदा दिवस उलटले तरी महापालिका कचरा कोंडीचा प्रश्न सोडवू शकली नाही. त्यामुळे शहरातील त्रस्त नागरिकांनी ठिकठिकाणी पडलेल्या कच-याला आग लावली. त्यामुळे दिवसभर शहरातील विविध भागांत धुराचे लोट दिसून येत होते. धुरामुळे आसपासच्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. कच-याला आग लावण्याच्या या दळभद्री प्रकारामुळे विशेषत: दम्याच्या रुग्णांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.
नारेगाव येथे शेतक-यांनी १६ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले आहे. नारेगाव कचरा डेपोवर एकही ट्रक १४ दिवसांमध्ये गेला नाही. सुरुवातीला महापालिकेने काही वॉर्डातील कचरा उचलून जिरवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयोगही अयशस्वी ठरला. त्यानंतर कचरा जशास तसा पडून आहे. या कच-यामुळे परिसरात राहणा-या नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत होत्या. अखेर बुधवारी महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कच-याच्या डोंगराला नागरिकांनीच आग लावून दिली. दिवसभर या कचºयातून धूर निघत होता. ओला व सुका कचरा एकत्र असल्याने धुरामुळे परिसरात राहणा-या आणि रस्त्याने ये-जा करणा-या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. हाच प्रकार इतर वसाहतींमध्येही सुरू होता. दम्याच्या रुग्णांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता. सर्वसामान्य नागरिकांची चिंता न करणारी महापालिका दम्याच्या रुग्णांची चिंता काय करणार, असा प्रश्नही नागरिक करीत आहेत.
शहरात दररोज चारशे मेट्रिक टन कचरा जमा होतो. मागील अनेक वर्षांपासून हा कचरा नारेगाव कचरा डेपोवर नेऊन टाकण्यात येत होता. या कच-यावर कोणतीही प्रक्रिया करण्यात येत नव्हती. मागील १४ दिवसांमध्ये मनपाने कचराच उचलला नाही. त्यामुळे शहरातील विविध वसाहतींमध्ये जवळपास साडेचार हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. कचरा उचलला तर नेऊन कुठे टाकावा हा सर्वात मोठा प्रश्न महापालिकेला भेडसावत आहे. महापालिकेने मागील काही दिवसांपासून शासकीय आणि खाजगी जागांचा पर्याय शोधला. प्रत्येक ठिकाणी कचरा टाकण्यास विरोधच झाला. त्यामुळे हतबल महापालिका आता न्यायालय काही तरी तोडगा काढेल या अशी अपेक्षांची प्रतीक्षा करीत आहे.

Web Title: The kind of garbage burning started in Aurangabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.