भोकरदनचे वाळूमाफिया सिल्लोडचे ‘किंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:48 AM2018-01-02T00:48:03+5:302018-01-02T00:48:55+5:30
भोकरदनच्या वाळू माफियांचा सिल्लोड तालुक्यात धुमाकूळ सुरू असून, वाळू माफियांना संबंधित पोलीस पाठीशी घालत आहेत. मिळणाºया हप्त्यांमुळे तस्करी रोखणारी यंत्रणा हतबल झाली आहे. सिल्लोड तालुक्यातील दिग्गज वाळूमाफिया भूमिगत असल्याने भोकरदन, जाफ्राबादचे वाळू माफिया सिल्लोडचे ‘किंग’ बनले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भोकरदनच्या वाळू माफियांचा सिल्लोड तालुक्यात धुमाकूळ सुरू असून, वाळू माफियांना संबंधित पोलीस पाठीशी घालत आहेत. मिळणाºया हप्त्यांमुळे तस्करी रोखणारी यंत्रणा हतबल झाली आहे. सिल्लोड तालुक्यातील दिग्गज वाळूमाफिया भूमिगत असल्याने भोकरदन, जाफ्राबादचे वाळू माफिया सिल्लोडचे ‘किंग’ बनले आहेत.
रॉयल्टीची एक कोरी पावती माफिया सोबत ठेवतात. पोलिसांनी वाहन पकडले की, लगेच त्यावर तारीख आणि वेळ टाकली जाते. या पावतीवर कित्येक दिवस अवैध वाळू वाहतूक चालते. हा गोरखधंदा चालवून वाळू माफिया शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहेत. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या वाळू तस्करीकडे पोलिसांचे लक्ष का जात नाही, हा मोठा प्रश्न आहे.
पोलिसांचे लोकेशन घेणारी यंत्रणा
जे अधिकारी हप्ते घेत नाहीत अशा अधिकाºयांवर नजर ठेवण्यासाठी वाळूमाफियांनी पगारी खबरे ठेवले असून, त्यांची खाजगी गुप्तचर यंत्रणा सिल्लोड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, त्यांचे निवासस्थान याशिवाय चौकाचौकातील नाक्यावर तैनात असते. ज्या मार्गावर हे अधिकारी फिरतात त्या मार्गावर हे खबरे वाहने फिरवून वाळू वाहनांचा मार्ग बदलवून टाकतात.
वाळूच्या टिप्परसोबत बॉडीगार्ड
ज्या रस्त्यावर वाळूचे टिप्पर चालतात, त्या टिप्परसोबत व पाठीमागे एका व्हीआयपी वाहनात ४-५ बॉडीगार्ड, तडजोड करणारी यंत्रणा, मोटारसायकलवर पोलिसांचे लोकेशन घेणारी यंत्रणा असल्याने कारवाई होत नाही.
सिल्लोड येथे नुकतेच आलेले उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार एकाकी वाळू माफिया, गोमांस तस्करांशी झुंज देत आहेत. काही स्थानिक पोलीस मात्र माफियांशी मिळालेले आहेत. यामुळे पोलिसांचे ‘टीमवर्क’ दिसत नाही. अधिकारी ऐकत नसतील तर अवैध धंदे करणाºया कर्मचाºयांना पकडून चांदी करून घेतात. त्यामुळे अधिकारी सोडून त्यांच्या कर्मचाºयांनाच जास्त भाव आला आहे. रात्री गस्त घालून गुन्हे रोखण्याऐवजी गुन्हेगारांना मदत करण्याचे काम काही पोलीस करताना दिसतात.
लाखो रुपये हप्ते
आधी महिन्याला १० ते १५ हजार रुपये दिले जाणारे हप्ते वाढले असून, एका टिप्परचा एक ते दीड लाख रुपये महिना हप्ता संबंधित यंत्रणेला दिला जातो.
सिल्लोड तालुक्यातील सर्व वाळूपट्टे बंद असल्याने सिल्लोड शहरासह तालुक्यात वाळूमुळे अनेकांच्या घराचे बांधकाम बंद आहे. जो जास्त पैसे मोजेल, त्यांना वाळू विकत मिळत आहे.
राजकीय दबाव वापरून, तर काही स्थानिक कर्मचाºयांना हाताशी धरून, तर कुठे हप्ते वाढवून भोकरदनच्या वाळू माफियांनी सिल्लोड तालुक्यात धुमाकूळ सुरू केला आहे. दररोज भोकरदन, जाफ्राबादकडून १० ते १५ टिप्पर सिल्लोड शहर व तालुक्यात येतात.
राजकीय दबावामुळे बदली
अजिंठ्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोहर वानखेडे यांनी वाळू माफियांवर कारवाई केल्याने गेल्या १५ दिवसांपूर्वी त्यांची तडकाफडकी गंगापूर येथे बदली करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील पोलिसांचे व काही अधिकाºयांचे मनोधैर्य खचले आहे. धंदे चालू दिले तर वरिष्ठ अधिकाºयांचा दबाव, कारवाई केली तर राजकीय दबाव, यामुळे पोलिसांनी आपले हित साधून बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. यामुळे तालुक्यात अवैध धंदे बोकाळले आहेत.