सुप्रिया सुळे यांनी जगप्रसिद्ध ‘खाजा’ची रेसिपी घेतली जाणून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:05 AM2021-09-21T04:05:32+5:302021-09-21T04:05:32+5:30
खुलताबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सकाळी वेरूळ, खुलताबाद परिसरातील पर्यटनस्थळांना भेट दिली. दरम्यान खुलताबादेतील ...
खुलताबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सकाळी वेरूळ, खुलताबाद परिसरातील पर्यटनस्थळांना भेट दिली. दरम्यान खुलताबादेतील थांबून त्यांनी ‘खाजा’ या खाद्यपदार्थाची रेसिपी जाणून घेतली. त्यानंतर विश्रामगृहात जेवण करताना सुप्रिया सुळे यांनी ‘खाजा’चा आस्वाद घेतला.
खा. सुप्रिया सुळे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सोमवारी सकाळी ८ वाजता त्या कुटुंबातील काही सदस्यांसह दौलताबाद किल्ल्यावर पर्यटनासाठी गेल्या. सुमारे दोन ते तीन तास दुर्गभ्रमंती करीत माहिती घेतली. त्यानंतर खुलताबाद येथील शासकीय विश्रामगृहाकडे त्या रवाना झाल्या. ‘जर जरी जर बक्ष’ यांच्या उरूस मैदान परिसरात त्यांना खाजा पदार्थाचा दुकाने दिसली. जगप्रसिद्ध असलेल्या ‘खाजा’ची रेसिपी जाणून घेण्यासाठी त्यांनी गाड्यांचा ताफाच दुकानासमोर थांबविला. खाजाचे विक्रेते शेख आसिफ शेख हाशम यांच्याशी संवाद साधत रेसिपी जाणून घेतली. त्यानंतर वेरूळ लेणीकडे रवाना झाल्या. लेणी परिसरात सुमारे तीन तास त्यांनी पाहणी केली. इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी यांनी सुप्रिया सुळे यांना लेण्यांबाबत माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीचे काही मोजकेच पदाधिकारी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
200921\fb_img_1632147709362.jpg
सुप्रिया सुळे खुलताबाद च्या प्रसिद्ध खाजाची विचारपूस करतांनी