संशोधन करण्यासाठी पायाभूत विज्ञानाचे ज्ञान महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 09:49 PM2019-04-21T21:49:15+5:302019-04-21T21:49:26+5:30
संशोधनाचा विकास होणे आणि पारदर्शीपणा येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागातील प्रा. डॉ. डी. जी. रेगूलवार यांनी केले.
औरंगाबाद : संशोधन ही विकासाची अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. संशोधनानेच वेगवेगळ्या समस्यांवर समाधान शोधणे आणि त्याचे समूळ निराकरण करणे शक्य होते. त्यामुळे संशोधनाचा विकास होणे आणि पारदर्शीपणा येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागातील प्रा. डॉ. डी. जी. रेगूलवार यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि एमआयटी महाविद्यालयातर्फे ‘संशोधन पद्धती आणि विश्लेषणात्मक तंत्र’ यावर दोनदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. डॉ. डी. जी. रेगूलवार यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. ते म्हणाले, संशोधन कार्य करण्यासाठी योग्य आणि उपयुक्त शोधनिबंध विषय निवड जितकी महत्त्वाची आहे, तितकेच महत्त्व संशोधनाला असते. त्यामुळे संशोधन विषय निवडताना अतिशय काळजी घ्यावी लागते, असेही डॉ. रेगूलवार यांनी सांगितले.
द्वितीय सत्रात प्राचार्य डॉ. नीलेश पाटील म्हणाले, संशोधकांना वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. संशोधनाच्या कक्षा रुंदावत असताना संशोधनाचा दर्जा उंचावला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. उत्तम काळवणे यांनीही प्रात्यक्षिके सादर करून मार्गदर्शन केले. तसेच डॉ. एस. एस. जामकर यांनी बौद्धिक संपदेचा अधिकार आणि पेटंट यावर विद्यार्थ्यांना सांगितले. शेवटच्या सत्रात डॉ. सुहेल हाश्मी यानी लिखित स्वरुपात संशोधन कार्य करण्यासाठीची माहिती सांगितली. प्रास्ताविक स्थापत्य विभागप्रमुख डॉ. मनीष दीक्षित यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अर्चना पाठक आणि प्रा. अलका वेव्हाळ यांनी केले. कार्यशाळेच्या संयोजक डॉ. माधुरी मांगूळकर यांनी आभार व्यक्त केले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. उत्तम काळवणे, प्रा. वासुदेव उपाध्ये आणि प्रा. सुनील पाटील, प्रा. एस. जी. कादरी, प्रा. अजय रत्नपारखी, प्रा. राम चाटोरीकर, प्रा. अभिषेक जैस्वाल, प्रा. उमेश साळुंखे, प्रा. योगेश शेरमाळे, प्रा. सुजित माने, प्रा. पूजा सूर्यवंशी, प्रा. सय्यद फहाद आदींनी प्रयत्न केले.