औरंगाबाद जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 08:55 PM2018-10-22T20:55:25+5:302018-10-22T20:56:13+5:30
औरंगाबाद : कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी जि. प. उपकरातून पावणेदोन कोटींचे गेट खरेदी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तथापि, पाणी अडविण्यासाठी या महिन्यात जि. प. सिंचन विभागाने काही बंधाºयांना उपलब्ध गेट टाकले असले, तरी आॅगस्ट महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे सध्या बहुतांशी बंधारे कोरडेठाक आहेत.
औरंगाबाद : कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी जि. प. उपकरातून पावणेदोन कोटींचे गेट खरेदी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तथापि, पाणी अडविण्यासाठी या महिन्यात जि. प. सिंचन विभागाने काही बंधा-यांना उपलब्ध गेट टाकले असले, तरी आॅगस्ट महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे सध्या बहुतांशी बंधारे कोरडेठाक आहेत.
यासंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी सांगितले की, जि. प. जलसंधारण समितीने १ कोटी ७५ लाख रुपयांचा गेट खरेदीचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर उपविभागनिहाय गेट खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात जि. प. उपकरातून पावणेदोन कोटी रुपयांची गेट खरेदीसाठी तरतूद करण्यात आली. त्यानुसार जलसंधारण समितीने सदरील प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर ई- निविदा प्रक्रियेस मान्यता मिळाली. पावणेदोन कोटी रुपयांतून १ हजार ८०० गेट खरेदी केले जाणार आहेत. उपकरातून रबरी सील खरेदीसाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रस्तावालाही जलसंधारण समितीने मान्यता दिली असून, निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मागील तीन वर्षांपासून गेट खरेदीचा प्रस्ताव चर्चेत आहे. पूर्वी जि. प. अर्थसंकल्पात उपकरातील २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची गेट खरेदीसाठी तरतूद करण्यात आली होती. दोन-अडीच वर्षांपासून सातत्याने निविदा काढण्यात आल्या; पण पुरवठादार संस्थांकडून निविदांना प्रतिसाद मिळत नव्हता. गेल्या वर्षी एक पुरवठादार संस्था तयार झाली.
मात्र, विद्यमान सदस्य मंडळाने सर्वसाधारण सभेत गेट खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तरतूद असतानाही प्रशासनाला गेट खरेदी करता आले नाहीत. केवळ गेटअभावी कोल्हापुरी बंधाºयांमध्ये पाणी अडवता येत नव्हते. यंदा पाऊस कमी झाला व त्यात पावसाचा मोठा खंडही पडला. त्यामुळे जिल्ह्यातील बंधा-यांमध्ये पाणी साचू शकले नाही. आता खरेदी करण्यात येणाºया गेटचा यंदा फायदा होणार नसला, तरी पुढील काळात याचा फायदा नक्कीच होईल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सिरसे म्हणाले.
३५७ बंधा-यांना गेट बसविले
जिल्ह्यात ५८५ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. यापैकी ३५७ बंधाºयांना पुरेसे गेट आहेत. उर्वरित २२८ बंधा-यांपैकी काहींना कमी गेट आहेत, तर काहींना गेटच नाहीत. यासाठी ७ हजार ५०० गेटची आवश्यकता आहे. उपकरातील निधीतून यंदा १ हजार ८०० गेट खरेदी केले जाणार आहेत. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ३८ बंधाºयांना १५५६ गेट बसविले जाणार आहेत. जि. प. उपकर व जलयुक्त शिवार योजनेतून या वर्षात सुमारे साडेतीन हजार गेट बसविले जातील.