कोपर्डी निकाल : फाशीची तातडीने अंमलबजावणी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:42 AM2017-11-30T00:42:54+5:302017-11-30T00:42:59+5:30

कोपर्डी घटनेतील नराधमांना मिळालेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करतानाच शिक्षा झालेले नराधम ज्या दिवशी फाशीवर लटकतील तीच पीडित मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तसेच मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

 Kopardi Result: The hanging should be implemented promptly | कोपर्डी निकाल : फाशीची तातडीने अंमलबजावणी व्हावी

कोपर्डी निकाल : फाशीची तातडीने अंमलबजावणी व्हावी

googlenewsNext

औरंगाबाद : कोपर्डी घटनेतील नराधमांना मिळालेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करतानाच शिक्षा झालेले नराधम ज्या दिवशी फाशीवर लटकतील तीच पीडित मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तसेच मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. राज्यात मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात औरंगाबादमधून झाली. त्यामुळे कोपर्डी खटल्याच्या निकालाकडे सर्व कार्यकर्ते आणि समाजबांधवांचे लक्ष होते. खटल्याचा निकाल आल्यावर आरोपींना झालेल्या शिक्षेबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले, तर विकृत मानसिकतेला यामुळे पायबंद बसेल, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली.
विकृतीला पायबंद बसेल
कोपर्डीतील दुर्दैवी घटनेतील आरोपींना फाशी देऊन न्यायालयाने त्या कन्येला खरा न्याय दिला. महाराष्ट्रातील समाजमन ढवळून काढणाºया या घटेनतील क्रूर कृत्याबद्दल दिलेल्या निकालाने विकृत मानसिकता असलेल्या प्रवृत्तींना जरब बसेल; परंतु महिलांवरील अन्याय या समाजात सहन केला जात नाही. हा सामाजिक संदेश समाजात प्रभावीपणे जाईल. त्याचबरोबर यापुढे असल्या वाईट घटना घडताच कामा नये, यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत.
-आमदार सतीश चव्हाण
संयम दाखविणे गरजेचे
कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाने मोठमोठे मोर्चे काढले. यानंतर आरक्षणाचा मुद्दा समोर आला. मराठा समाजाने न्यायव्यवस्थेवर पूर्णत: विश्वास ठेवला. दीड ते पावणेदोन वर्षे समाजाने दाखविलेल्या संयमाचे फळ आज मिळाले. कोपर्डीच्या घटनेतील दोषींना फाशी झाली म्हणून आनंद व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. आरक्षणाच्या मुद्यावरही आता संयम दाखवणे गरजेचे आहे. तरच उज्ज्वल भविष्य आहे. संयमामुळे फायदा
होतो.
- मानसिंग पवार, उद्योजक तथा समन्वयक मराठा क्रांती मोर्चा
न्याय मिळाला
कोपर्डी प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशी देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत. न्याय मिळाला. संभाजी ब्रिगेडने सुरू केलेल्या लढ्याला यश.
- डॉॅ. शिवानंद भानुसे,
प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड
ऐतिहासिक निर्णय
कोपर्डीतील पीडितेवर अमानुष अत्याचार आणि तिचा खून करणाºया नराधमांना न्यायालयाने सुनावलेली फाशी हा ऐतिहासिक निर्णय. या निकालामुळे यापुढे असे कृत्य करण्यास कोणीही धजावणार नाही. मराठा क्रांती मोर्चाची पहिली मागणी कोपर्डीच्या नराधमांना फाशी द्या, हीच होती. न्यायालयाने जनभावनेचा आदर केला. आम्हीही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो.
-अंबादास दानवे,
शिवसेना जिल्हाप्रमुख
न्यायालयाचे आभार
आमच्या बहिणीवर पाशवी अत्याचार करणाºया नराधमांना शेवटी फाशी झालीच. पण ज्या दिवशी या नराधमांना फासावर लटकावण्यात येईल, तीच खरी श्रद्धांजली. यामुळे यापुढेही आमचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे. मराठा क्र ांती मोर्चाची नोंद घेऊन सरकारने जलद कारवाई केल्याबद्दल आणि अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे आभार. सरकारने समाजाच्या उर्वरित मागण्याही लवकर पूर्ण कराव्यात.
- मनीषा वडजे, अध्यक्षा,
छावा मराठा युवा संघटन
निकालाने समाधानी
या निकालाबद्दल आम्ही निश्चितच समाधानी आहोत; परंतु जोपर्यंत आरोपींना फासावर लटकावताना आम्ही पाहत नाही, तोपर्यंत आम्ही स्तब्ध बसणार नाहीत... आजचा हा निकाल आरोपींवरच नाही तर त्यांना साथ देणाºया सर्वांना जरब बसविणारा आहे. या निकालाची अंमलबजावणी तातडीने व्हावी एवढीच अपेक्षा आहे. सर्वच समाजातील महिलांच्या रक्षणासाठी नेहमीच सज्ज राहू.
-रवी काळे पाटील, समन्वयक,
मराठा क्रांती मोर्चा
मराठा समाजाच्या संघर्षाचा विजय
कोपर्डीतील पीडितेवर अत्याचार करणाºयांना फासावर लटकावा, ही पहिली मागणी मराठा क्र ांती मोर्चाची होती आणि या मागणीसाठी राज्यातील पहिला मोर्चा औरंगाबादेत ९ आॅगस्ट रोजी काढण्यात आला. त्यानंतर राज्यभर मोर्चे निघाले. समाजाने वर्षभर दिलेल्या संघर्षामुळे पीडितेला न्याय मिळाला आणि न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील तपास यंंत्रणा, पोलीस खाते, साक्षीदार, सरकारी वकील उज्ज्वल निकम व न्यायालय यांचे आभार.
- अप्पासाहेब कुढेकर, समन्वयक, मराठा क्र ांती मोर्चा
निकाल अपेक्षितच
तिन्ही नराधमांना न्यायालयाकडून फाशी सुनावली जाईल, या अपेक्षेप्रमाणे न्यायालयाने आज निर्णय दिला. मात्र आरोपींना लवकरात लवकर फाशी होईल, यासाठी यापुढील प्रक्रिया जलदगतीने व्हावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर आमचा विश्वास आहे. राज्यातील अन्य बलात्काराच्या घटनांमधील आरोपींनाही अशीच शिक्षा झाली पाहिजे.
- रमेश गायकवाड, समन्वयक,
मराठा क्रांती मोर्चा
अखेर न्याय मिळाला
कोपर्डीतील नराधमांना फाशी हीच शिक्षा योग्य होती. माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. कोपर्डीच्या ताईला न्याय मिळाला. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. भावनांचा उद्रेक होऊन आपल्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक मोर्चे निघाले. लोक एकवटले. त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाल्याने असे कृत्य करणाºया नराधमांवर वचक बसेल. या निर्णयामुळे पुरोगामी महाराष्ट्रात असल्या वाईट घटनांना चाप बसेल.
-अभिजित देशमुख, समन्वयक,
मराठा क्रांती मोर्चा
२ा
आजच्या निकालाने क ोपर्डीच्या ताईला न्याय मिळाला. मराठा क्र ांती मोर्चाचा व महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाचा विजय आहे. या निकालामुळे असे नीच कृत्य करणाºया नराधमांना जरब बसेल आणि ते असे कृत्य करण्यास धजावणार नाहीत. यापुढे कोठेही अशी घटना घडल्यास मराठा क्र ांती मोर्चा आवाज उठवेल.
- रमेश केरे, समन्वयक,
मराठा क्रांती मोर्चा
२ा
कोपर्डीच्या ताईवर अमानुष अत्याचार आणि तिचा खून करणाºया तिन्ही आरोपींना न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा, ही समाजाच्या एकीचा विजय आहे. अत्याचारानंतर १८ जुलै रोजी राज्यातील पहिली हिंसक प्रतिक्रिया देत आपण एस. टी. महामंडळाची बस फोडली होती. यानंतर आपल्याला अटकही झाली. समाजातील सहकाºयांनी आपल्या पाठीशी उभे राहून आपला जामीनही घेतला. मात्र राज्यभर आंदोलन पेटले. आपण ज्यासाठी जेलमध्ये गेलो त्याचे आज सार्थक झाले असे वाटते.
-सुनील कोटकर, समन्वयक,
मराठा मोर्चा
ं२ा
अत्याचारी तीन जणांना फाशीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजातील सर्व स्तरातील लोकांनी विशेषत: तरुणांनी अत्यंत संयमाने आणि शांततेत आंदोलन केले. या घटनेनंतर मराठा समाजात आपुलकीची भावना वाढली. राज्यभर निघालेल्या मोर्चानंतर शासनाने हा खटला जलदगती न्यायालयात चालविल्याने अपेक्षेप्रमाणे आजचा निकाल लागला. शासनाने यापुढेही जातपात न पाहता अशा घटनांमधील आरोपींना लवकरात लवकर शासन होईल यासाठी त्यांचे खटले जलदगती न्यायालयात चालवावीत.
- अ‍ॅड. स्वाती नखाते,
समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
ं२ा
फाशीची शिक्षा झाली, पण अंमलबजावणी होईपर्यंत संभाजी ब्रिगेड पाठपुरावा करणार आहे. आमचा कायद्यावर विश्वास आहे. कोपर्डी प्रकरणाचा आणि इतर प्रकरणांचा कोणीही संबंध जोडू नये. आजचा निर्णय हे सर्व मराठा समाजाचे यश आहे. या निर्णयाने बलात्कारांच्या घटनांना आळा बसेल.
- राहुल बनसोड, संभाजी ब्रिगेड

Web Title:  Kopardi Result: The hanging should be implemented promptly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.