रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे कोविड योद्धे

By | Published: November 29, 2020 04:04 AM2020-11-29T04:04:32+5:302020-11-29T04:04:32+5:30

\Sऔरंगाबाद : येथील रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे पदमपुरा भागातील कोविड योद्धे तसेच झोन ८ सातारा, देवळाई आणि बीड बायपास ...

Kovid Yodha on behalf of Ramakrishna Mission Ashram | रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे कोविड योद्धे

रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे कोविड योद्धे

googlenewsNext

\Sऔरंगाबाद : येथील रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे पदमपुरा भागातील कोविड योद्धे तसेच झोन ८ सातारा, देवळाई आणि बीड बायपास या भागातील कीटकनाशक व धूर फवारणी कामगारांना आश्रमचे प्रमुख स्वामी विष्णुपादानंद महाराज यांच्या हस्ते

ब्लेझर आणि फराळ वाटप करण्यात आला. याप्रसंगी आश्रमाचे स्वामी चेतनात्मानंद महाराज उपस्थित होते. प्रमुख स्वामी महाराजांनी मार्गदर्शन केले व कोरोनाविषयी जागरूक राहण्याचा संदेश दिला. रामकृष्ण मिशनतर्फे नेहमीच मदत कार्याचे उपक्रम राबविले जातात. यंदा कोरोना काळात ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली, असे कोविड योद्धे, ऑबेट ट्रीटमेंट, कीटकनाशक व धूर फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम मास्क घालून व सोशल डिस्टन्स ठेवून संपन्न झाला. कार्यक्रमास पर्यवेक्षक शेख अन्वर व इतर कामगार उपस्थित होते.

Web Title: Kovid Yodha on behalf of Ramakrishna Mission Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.