औरंगाबादेत शिक्षण क्षेत्राचा भरणार कुंभमेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:07 AM2018-05-19T00:07:00+5:302018-05-19T00:08:23+5:30

शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रांत नेहमीच पुढाकार घेणाऱ्या ‘लोकमत’ समूहातर्फे दि.२५ ते २७ मेदरम्यान अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार येथे सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठीचे प्रदर्शन सुरू राहील.

Kumbh Mela to fill the education sector in Aurangabad | औरंगाबादेत शिक्षण क्षेत्राचा भरणार कुंभमेळा

औरंगाबादेत शिक्षण क्षेत्राचा भरणार कुंभमेळा

googlenewsNext
ठळक मुद्दे२५ ते २७ मे : लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर-२०१८

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रांत नेहमीच पुढाकार घेणाऱ्या ‘लोकमत’ समूहातर्फे दि.२५ ते २७ मेदरम्यान अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार येथे सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठीचे प्रदर्शन सुरू राहील. यात विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी दिशादर्शक मार्गदर्शन ठरणार आहे. या शैक्षणिक कुंभमेळ्यानिमित्त सर्व नामांकित शिक्षण संस्थांची इत्थंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होत आहे.
अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून आपल्या पाल्याने कोणता अभ्यासक्रम निवडावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. सर्व शिक्षण संस्थांची तसेच सर्व अभ्यासक्रमांविषयी सखोल माहिती पुरविणारे हे प्रदर्शन असेल. या उपक्रमाद्वारे शिक्षण संस्थांनाही हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचता येईल. पालक असो या पाल्य दोघांच्याही मनात करिअरविषयक असणाºया सर्व समस्यांचे प्रदर्शनाद्वारे निरसन केले जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील. महाविद्यालये, शाळा, वैद्यकीय, अभियांत्रिकी, आॅर्किटेक्चरपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटेरिअर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेज, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्यूट प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे निश्चितच पालक आणि विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे.
नावनोंदणीसाठी संपर्क
मोजकेच स्टॉल शिल्लक असल्याने नामांकित शिक्षण संस्थांनी आलेली संधी न दवडता त्वरित स्टॉल बुक करावा. यानिमित्ताने एका नव्या वर्गाला आपल्या संस्थेशी जोडण्याची संधी मिळणार आहे. अधिक माहिती व स्टॉल बुकिंगसाठी संपर्क- (मो.नं. ९६७३७५९५८५/ ९९२१४८११४७)

Web Title: Kumbh Mela to fill the education sector in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.