छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी पुरावे कमी, तहसीलनिहाय पुन्हा शोधाशोध सुरू

By विकास राऊत | Published: December 7, 2023 01:04 PM2023-12-07T13:04:50+5:302023-12-07T13:05:19+5:30

आणखी पुरावे सापडतात का, यासाठी तालुकानिहाय पुराव्यांची जंत्री पुन्हा उघडून पाहत आहे पथक

Kunabi evidence less in Chhatrapati Sambhajinagar district, tehsil-wise search begins again | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी पुरावे कमी, तहसीलनिहाय पुन्हा शोधाशोध सुरू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी पुरावे कमी, तहसीलनिहाय पुन्हा शोधाशोध सुरू

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत मराठा-कुणबी पुरावे कमी प्रमाणात आढळले आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाने स्थापन केलेल्या समितीच्या आदेशाचे हिंगोली जिल्ह्याचे पथक छत्रपती संभाजीनगरमधील पुराव्यांची जंत्री पुन्हा तहसीलनिहाय शोधू लागले आहे. 

बुधवारी समितीने तहसीलदार, नायब तहसीलदारांची बैठक घेत सूचना केल्या. तसेच पथकाची दोन टप्प्यांत विभागणी करण्यात आली असून तालुकानिहाय पुरावे पाहिले जात आहेत. समितीने तालुकानिहाय अभिलेख कक्षातील आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. हे पथक आठ डिसेंबरपर्यंत थांबणार असून, आणखी पुरावे सापडतात का, यासाठी तालुकानिहाय पुराव्यांची जंत्री पुन्हा उघडून पाहत आहे. तीन महिन्यांत जिल्हा प्रशासनाने १९ लाख ३८ हजार ११५ पुरावे तपासले. त्यात १२७८ कुणबी-मराठा अशा नोंदी आढळून आल्या. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूरमध्ये कमी पुरावे आढळले.

हिंगोलीतील अप्पर जिल्हाधिकारी प्रवीणकुमार धरमकर, उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा, अप्पर तहसीलदार एस. डी. सुरे यांची पथकात नियुक्ती केली आहे. ८ डिसेंबरपर्यंत हे पथक पुन्हा पुराव्यांची शोधाशोध करणार आहे. खासरापत्र, पाहणीपत्र, क-पत्रक, कुळ नोंदवही, १९५१ चे राष्ट्रीय रजिस्टर, हक्क नोंद पत्र, फेरफार पत्र, ७/१२, गाव नमुना, प्रवेश निर्गम नोंदवही, अनुज्ञप्ती नोंदवही, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना नोंद, कारागृहातील नोंदी, गाववारी, गोपनीय रजिस्टर, क्राइम रजिस्टर, अटक पंचनामे, एफआयआर, मुद्रांक विभागातील १३ प्रकारचे दस्तावेज, भूमी अभिलेखमधील सात दस्तावेज, मुंतखब इ. अभिलेखांमध्ये काही नोंदी घेण्याचे राहून गेले काय, याचा आढावा पथक घेत आहे.

Web Title: Kunabi evidence less in Chhatrapati Sambhajinagar district, tehsil-wise search begins again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.