डाळिंबाच्या बागेवर चालविली कु-हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 04:37 AM2018-12-02T04:37:27+5:302018-12-02T04:37:45+5:30

अनेक वर्षांपासून पोटच्या मुलासारखी जपलेली डाळिंबाची बाग पाणी नसल्याने स्वत:च्या हाताने तोडून टाकण्याची दुर्दैवी वेळ येथील शेतकऱ्यावर आली.

Kunda is run on a pomegranate garden | डाळिंबाच्या बागेवर चालविली कु-हाड

डाळिंबाच्या बागेवर चालविली कु-हाड

googlenewsNext

- जितेंद्र डेरे

लाडसावंगी (जि. औरंगाबाद) : अनेक वर्षांपासून पोटच्या मुलासारखी जपलेली डाळिंबाची बाग पाणी नसल्याने स्वत:च्या हाताने तोडून टाकण्याची दुर्दैवी वेळ येथील शेतकऱ्यावर आली. औरंगाबाद तालुक्यातील औरंगपूर येथील सचिन बप्पाजी म्हस्के यांनी ४५० हिरवीगार झाडे कुºहाडीने तोडून टाकली. हस्के यांनी उपलब्ध पाण्यावर मोसंबीची ७०० व डाळिंबाची ९०० झाडे फुलविली होती; परंतु
यंदा पाऊस कमी पडल्याने निराशा झाली. शेततळ््यानेही तळ गाठला तर दोन विहिरींपैकी एक कोरडी पडली. दुसºया विहिरीचे पाणी केवळ अर्धा तास मिळते. त्यावर एवढी झाडे जगवणे अवघड आहे. सर्व झाडे जगविण्याच्या नादात बागच वाळेल, हे लक्षात आल्याने त्यांनी ४५० झाडे तोडली.
>लावली होती ९०० झाडे
२०११ मध्ये डाळिंबाची ९०० झाडे लावली होती. २०१२ च्या दुष्काळात झाडे लहान असल्यामुळे ती कमी पाण्यात व विकतच्या पाण्यावर जगविली. या झाडांनी पाच ते सहा वर्षे चांगले उत्पन्न दिले. मात्र, यंदा दुष्काळाने पुन्हा घात केला. आम्हाला शासनाकडून पैसा नको, बागा वाचविण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले तरी पुरे झाले. - सचिन म्हस्के, शेतकरी

Web Title: Kunda is run on a pomegranate garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.