लेबर कॉलनीवरून सेना-भाजपात जुंपली
By Admin | Published: May 22, 2016 12:24 AM2016-05-22T00:24:26+5:302016-05-22T00:39:25+5:30
औरंगाबाद : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लेबर कॉलनी येथील शासकीय निवासस्थानांचा विषय मागील अनेक वर्षांपासून गाजत आहे.
औरंगाबाद : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लेबर कॉलनी येथील शासकीय निवासस्थानांचा विषय मागील अनेक वर्षांपासून गाजत आहे. शासकीय पातळीवर या भागातील २५० घरे रिकामी करून जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या हालचालींचा अचूक फायदा घेत अगोदर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बांधकाममंत्र्यांना निवेदन देऊन आघाडी घेतली. भाजपने या प्रकरणात उडी घेताच सेनाही मागे राहिली नाही. खा. चंद्रकांत खैरे यांनी लेबर कॉलनीत शनिवारी बैठक घेऊन भाजप नेत्यांना कॉलनीत येऊ देऊ नका, ते काही करू शकत नाही, असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याचा भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बैठकीतच कडाडून विरोध केला. लेबर कॉलनीच्या मुद्यावर सेना-भाजपने आपसात जोरदार चिखलफेक सुरू केली आहे.
१९६० च्या दशकात लेबर कॉलनीत विविध शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली. असंख्य कर्मचाऱ्यांनी पन्नास वर्षांनंतरही शासकीय निवासस्थानाचा ताबा सोडला नाही. निवासस्थानांची जागा शासकीय असल्यामुळे ती खाली करून घेण्याची तयारी विभागीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. या जागेवर विभागीय प्रशासकीय संकुल उभारण्यासाठी प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने क्वॉर्टर्समधील नागरिकांना १५ दिवसांत इमारती खाली करण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत.
दरम्यान, भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर यांनी शुक्रवारी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन नागरिकांतर्फे निवेदन दिले. बांधकाममंत्री (पान २ वर)