वाळूज उद्योगनगरीत कामगार दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 08:47 PM2019-05-02T20:47:02+5:302019-05-02T20:47:28+5:30
वाळूज उद्योनगरीत बुधवारी जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वाळूज महानगर : वाळूज उद्योनगरीत बुधवारी जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या परिसरातील कामगार संघटनाच्या पदाधिकारी व कामगारांची उद्योनगरीतील कामगार पुतळ्यास अभिवादन करुन कामगारांना मार्गदर्शन केले.
न्यू पँथर कामगार सेना
भारिप बहुजन महासंघ प्रणित न्यू पँथर कामगार सेनेच्यावतीने उद्योनगरीतील कामगार पुतळ्याला भारिपचे प्रदेश महासचिव अमित भुईगळ, न्यु पँथर सेनेचे संस्थापक अनिल जाभाडे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला भारिप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर साळवे, महासचिव श्याम भारसाखळे, सचिव सिद्धार्थ पैठणे, सुनिल सदावर्ते, प्रकाश निकम, प्रविण नितनवरे, भैय्यासाहेब जाधव, विजय सरोदे, संतोष घोडके, शेख मुक्तार, अंजन साळवे, अनिल तुपे, अजय भिडे, संतोष घलगे, प्रमोद तिवारी, अजित साबळे, गोपीचंद वल्ले, माणिक मोरे, नागेश झोडपे आदी उपस्थित होते.
सिटु कामगार संघटना
सिटु कामगार संघटनेच्यावतीने कामगार दिनाचे औचित्य साधुन दुचाकी रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. येथील कामगार चौकात असलेल्या कामगार पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी अॅड. उद्धव भवलकर यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कॉ.शंकर नन्नुरे, दिंगबर शिंदे, विश्वनाथ शेळके आदीसह कामगार व सिटुचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्टÑ कामगार विकास संघटना
महाराष्टÑ कामगार विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैस्वाल, संस्थापक सचिव रामकिसन पा. शेळके, राज्य उपाध्यक्ष गणेश घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी रॅली व जाहीर सभेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कामगार चौकातील कामगार पुतळ्यास अभिवादन करुन दुचाकी रॅटली काढण्यात आली. पंढरपूर, तिरंगा चौक, मोरे चौक, जागृत हनुमान मंदिर आदी मार्गांवरुन दुचाकी रॅली काढुन बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. यानंतर आयोजित जाहीर सभेत राज्य उपाध्यक्ष गणेश घोरपडे यांनी कामगार कायद्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला शिवशंकर सगट, भाऊसाहेब गुलदगड, रवी लहुगळे, भगवान वाघ, संतोष दळवी आदी उपस्थित होते.
महाराष्टÑ कामगार कल्याण मंडळ
बजाजनगरातील कामगार कल्याण मंडळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात गुणवंत कामगार रतन पाटील, पी.एस.गुजर, शिवाजी तुरटवाड, अशोक गावंडे आदींच्या प्रमूख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविक मंडळाचे दिनकर पाटील यांनी केले. कार्यक्रमाला ज्ञानेश्वरी ताले, सुषमा पोटे, संगिता पवार, सिता पहिवाल आदी उपस्थित होते.
सामाजिक विचार मंच
सामाजिक विचार मंचच्यावतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. कामगार चौकात सामूहिक प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी मनिष जैस्वाल , गजानन नांदुरकर, केशव ढोले, किशोर सेलकर, जि.प.सदस्या रेखा नांदुरकर, तेजस्विता पंडीत, स्वाती चव्हाण, वनदना तुपे, सविता शिंदे, भारती शेलगावकर, मिनाक्षी मालोदे, अंकिता राऊत, रविंंद्र शेलकर, चंद्रकांत देशमुख, शिवाजी राऊत, शशीकांत नारखेडे, धमेंद्र चौधरे, श्रीनिवास कळमकर, विनोद वडतकर, अर्जुन अहिरे, रविंद्र जगताप, दत्ता नाईक़नवरे, रुपचंद्र अग्रवाल, गणेश पळसकर आदी उपस्थित होते.
पँथर पावर कामगार संघटना
संघटनेचे राज्य सचिव डॉ.सिद्धांत गाडे यांच्या हस्ते कामगार पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला संघटनेचे सहसचिव सुनिल गडकर, सतीश आळंजकर, संतोष गाडेकर, अप्पासाहेब शेजवळ, सुरेश वाघ, ज्ञानेश्वर भावले, कुमार ओझा आदी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्यावतीने विविध मार्गावरुन दुचाकी रॅली काढण्यात आली.