लासूर स्टेशन येथील आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:02 AM2021-01-18T04:02:56+5:302021-01-18T04:02:56+5:30
लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सावंगी, खडकनाराळा, आसेगाव, जांभाळा, दि. पिंपळगाव, डोणगाव, माळी वाडगाव असे सात उपकेंद्र आहेत. ...
लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सावंगी, खडकनाराळा, आसेगाव, जांभाळा, दि. पिंपळगाव, डोणगाव, माळी वाडगाव असे सात उपकेंद्र आहेत. ७० हजार ३७२ नागरिक अवलंबून आहेत. तसेच सिद्धनाथ वाडगाव व वैजापूर तालुक्यातील बोरसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गलथान कारभारामुळे लासूर स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्रावर अधिक भार आहे. मात्र लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील इमारतीमध्ये रुग्णांसाठी केवळ आठ बेड आहेत. महिन्याला ५० ते ६० प्रसूती येथे होतात. तसेच एका बोअरवेलने येथील पाण्याची गरज भागविली जाते. या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत कुचकामी झाली असून, स्लॅबचे पोपडे पडत आहेत. त्यामुळे या आरोग्य केंद्राला नवीन इमारतीची आवश्यकता आहे. अनेक सुविधांची वाणवा असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांना नाइलाजाने खासगी रुग्णालयांकडे जावे लागते. यात पैसे व वेळ दोन्हींची हाणी होत असल्याने येथील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
चाैकट
दहा दिवसांपूर्वी प्रसूतिगृहाला लागली होती आग
लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतिगृहाला दहा दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. यात गादी जळून गेली. रात्री प्रसूतिगृह बंद असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे येथे आग रोखण्यासाठी केवळ दोन छोटे अग्निरोधक यंत्र आहे. अग्निशमन दल औरंगाबाद येथून ४५ कि.मी.अंतरावर आहे.
फोटो आहे.