ट्रक टर्मिनलमध्ये सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:05 AM2021-01-16T04:05:02+5:302021-01-16T04:05:02+5:30

------------------------- बजाजनगरातून कामगार बेपत्ता वाळूज महानगर : कंपनीत कामाला जातो, असे म्हणून घराबाहेर पडलेला कामगार बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी ...

Lack of facilities in truck terminal | ट्रक टर्मिनलमध्ये सुविधांचा अभाव

ट्रक टर्मिनलमध्ये सुविधांचा अभाव

googlenewsNext

-------------------------

बजाजनगरातून कामगार बेपत्ता

वाळूज महानगर : कंपनीत कामाला जातो, असे म्हणून घराबाहेर पडलेला कामगार बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. आनेश्वर नारायण बनकर (३३ रा.द्वारकानगरी, बजाजनगर) हा कामगार १३ जानेवारील सकाळी ६ वाजेच्या सुमारास कंपनीत कामाला जातो, असे म्हणून घराबाहेर पडला होता. मात्र तो अद्यापपर्यंत घरी न परतल्याने त्याचे वडील नारायण बनकर यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.

-----------------------

पंढरपूरात महिलेस मारहाण

वाळूज महानगर : पंढरपूरात ३८ वर्षीय महिलेस मारहाण करणाºया चौघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयशा वसिम बेग यांचा लहान मुलगा मुज्जमीन हा बुधवारी सायकल खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. घराशेजारी राहणाºया खातुनबी, मुलगा अजहर व दोन मुलींनी मुज्जमीन यास सायकल खेळण्याच्या कारणावरुन मारहाण केली. यानंतर मुज्जमीन याने घरी येऊन आई आयशा हिस या प्रकाराची माहिती दिली. यानंतर काही वेळाने खातुनबी व तिच्या सोबत आलेल्या तिघांनी आयशा बेग यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.

-------------------------------------

दुभाजकावरील जाळ्या बनल्या धोकादायक

वाळूज महानगर : वाळूज येथे रस्ता दुभाजकावर टाकण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक जाळ्या ठिक-ठिकाणी तुटल्या असून रस्त्यावर आल्या आहेत. रस्त्यावर आलेल्या या लोखंडी जाळ्यामुळे ये-जा करणाºया वाहनधारकांना कसरत करीतच ये-जा करावी लागत आहे. या धोकादायक जाळ्यामुळे अपघाताचा धोका बळावला असून या जाळ्या हटवुन नवीन जाळ्या उभारण्याची मागणी नागरिकांतुन होत आहे.

-----------------

वडगाव रस्त्यावर सांडपाणी

वाळूज महानगर : बजाजनगरातुन वडगावकडे जाणाºया रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने पादचारी व वाहनधारकांना आडखळत ये-जा करावी लागत आहे. बजाजनगरातील सोसायटीचे सांडपाणी या रस्त्यावर साचत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहेत. या सांडपाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी त्रस्त नागरिकाकडून केली जात आहे.

---------------------

Web Title: Lack of facilities in truck terminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.