घाटीमध्ये स्ट्रेचरची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:56 AM2017-09-19T00:56:35+5:302017-09-19T00:56:35+5:30

घाटी रुग्णालयातील अपघात विभागात दररोज २०० ते ३०० रुग्ण दाखल होतात; परंतु स्ट्रेचरच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी वेदना सहन करीत दाखल होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते.

 The lack of stretcher in Ghati hospital | घाटीमध्ये स्ट्रेचरची कमतरता

घाटीमध्ये स्ट्रेचरची कमतरता

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात दररोज २०० ते ३०० रुग्ण दाखल होतात; परंतु स्ट्रेचरच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी वेदना सहन करीत दाखल होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. स्ट्रेचरअभावी रुग्णांच्या गैरसोयीच्या घटना घडत असताना घाटी प्रशासन गाढ झोपेत आहे.
ट्रक आणि क ार अपघातातील रस्त्यावर पडलेल्या गंभीर जखमी व्यक्त ीला शनिवारी रात्री महावितरणचे प्रादेशिक संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी उचलून स्वत:च्या वाहनातून घाटीत नेले. कारमधून अपघात विभागात नेण्यासाठी त्यांना तब्बल दहा ते बारा मिनिटे स्ट्रेचर शोधावे लागले. स्ट्रेचर न मिळाल्याने घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागासमोरच एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना जूनमध्ये घडली होती. दररोज घाटीत स्ट्रेचरअभावी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
घाटीत आजघडीला ९२ स्ट्रेचर आहेत. यामध्ये अपघात विभागात १५ स्ट्रेचर असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात अपघात विभागाच्या एखाद्या कोपºयात एखाद दुसरे स्ट्रेचर दिसते. त्यामुळे १५ स्ट्रेचर कागदावरच आहे. अपघात विभागाच्या प्रवेशद्वारावरच स्ट्रेचर उपलब्ध असणे आवश्यक आहे. यातून रुग्णाला तात्काळ उपचारासाठी दाखल करता येते; परंतु आजघडीला रुग्णवाहिका, रिक्षा, वाहनांतून रुग्ण दाखल झाल्यानंतर नातेवाईकांना स्ट्रेचरची शोधाशोध करावी लागते. रुग्णालयाचा विस्तार पाहता स्ट्रेचरची संख्या वाढविण्यासाठी घाटी प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न होत नाही.

Web Title:  The lack of stretcher in Ghati hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.