लाडसावंगी बातमीतील कोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:04 AM2021-07-09T04:04:21+5:302021-07-09T04:04:21+5:30
मी सुरुवातीला ८ जून रोजी तीन एकरात चार बॅग कपाशीची लागवड केली होती. बियाणेही उगवून आले; परंतु त्यावर वीस ...
मी सुरुवातीला ८ जून रोजी तीन एकरात चार बॅग कपाशीची लागवड केली होती. बियाणेही उगवून आले; परंतु त्यावर वीस दिवस पाऊस न पडल्याने सर्व कपाशी करपून केली. यानंतर २७/२८ जूनला पाऊस पडल्याने ३० जूनला पुन्हा चार बॅग कपाशी लागवड केली आहे. मात्र, दहा दिवसांपासून पाऊस नसल्याने आता तिबार पेरणीचे संकट कोसळले आहे. नंतर पैसे कोठून आणावे हा प्रश्न आहे.
-राम गाढेकर, शेतकरी, भोगलवाडी
कोट
मी दोन एकरात २९ जून रोजी दोन बॅगसह आठ किलो मका लागवड केली आहे. बियाणे तीन हजार, रासायनिक खत दोन बॅग २ हजार ८०० रुपये, मका लागवडीसाठी तीन हजार मजुरी, सरी पाडणे आदींसह दहा हजार रुपये खर्च झाला. पाऊस नसल्याने हा सर्व खर्च वाया जात आहे.
-अजिनाथ शिंदे, शेतकरी, लाडसावंगी