लाडसावंगीचे मोबाइल टॉवर बनले शोभेची वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:09 AM2021-09-02T04:09:42+5:302021-09-02T04:09:42+5:30
लाडसावंगी, लामकाना, अंजनडोह या तीन गावांत बीएसएनएलची मोबाइल सेवा आहे, परंतु या तिन्ही गावांतील सेवा एक दिवस सुरू तर ...
लाडसावंगी, लामकाना, अंजनडोह या तीन गावांत बीएसएनएलची मोबाइल सेवा आहे, परंतु या तिन्ही गावांतील सेवा एक दिवस सुरू तर चार दिवस बंद राहते. यामुळे बीएसएनएलचे ग्राहक इतर कंपन्यांकडे वळले असून, आता केवळ बोटावर मोजण्याइतके ग्राहक उरले आहेत. लाडसावंगी परिसरात एके काळी बीएसएनएलची मोठी ग्राहक संख्या होती, परंतु ही सेवा सतत खंडित होणे, सेवा चार-चार दिवस बंद राहण्याला ग्राहक वैतागले होते. त्यामुळे ते इतर सेवांकडे वळले आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली, तर एकही ग्राहक बीएसएनएलकडे राहणार नाही. या विषयी संबंधित अभियंता सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, औरंगाबाद-जालना रोडवर गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम होत असल्यामुळे, दररोज ओएफसीचे केबल तुटत असल्यामुळे मोबाइल सेवा खंडित होत असल्याचे त्यांनी सांगितले.