लाखावर बालके तपासणीपासून वंचित!
By Admin | Published: July 11, 2014 11:47 PM2014-07-11T23:47:21+5:302014-07-12T01:13:37+5:30
बीड : मोठा गाजावाजा करत सुरु केलेल्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम सुरु करण्यात आला; परंतु तपासणीसाठी नेमलेले पथक २८८४ पैकी केवळ २४९६ अंगणवाड्यांपर्यंतच पोहोचू शकले.
बीड : मोठा गाजावाजा करत सुरु केलेल्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम सुरु करण्यात आला; परंतु तपासणीसाठी नेमलेले पथक २८८४ पैकी केवळ २४९६ अंगणवाड्यांपर्यंतच पोहोचू शकले. जिल्ह्यातील सुमारे १ लाख ५ हजार ७८८ इतकी बालके वैद्यकीय तपासणीपासून वंचितच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कुपोषणात भरच पडत असल्याचेही उघड झाले आहे.
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमासाठी ३९ पथके कार्यरत आहेत. एका पथकात चौघे जण नेमलेले आहेत. एक पुरूष व एक स्त्री असे दोन बीएएमएस डॉक्टर, एक फार्मसिस्ट, एक परिचारिका यांचा त्यात समावेश असतो. त्यांना स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली असून महिन्याकाठी २५ लाख रुपयांचा खर्च केला जातो. जिल्ह्यात २ हजार ८८४ इतक्या अंगणवाड्या आहेत; पण त्यापैकी केवळ २ हजार ४९६ अंगणवाड्यांची तपासणी केलेली आहे. ३८८ अंगणवाड्यांतील बालकांची तपासणी अजून अपूर्णच आहे. एप्रिल ते जून २०१४ या दरम्यान २ लाख ७३ हजार ९८९ बालकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १ लाख ६८ हजार २०१ बालकांची तपासणी केलेली आहे. १ लाख ५ हजार ७८८ बालके तपासणीपासून दूरच आहेत. पथक अंगणवाड्यांमध्ये गेले तेंव्हा बालकेच हजर नव्हती. त्यामुळे ती वंचित राहिल्याचा शेरा पथकांनी लिहिला आहे; पण शंभर टक्के तपासणीसाठी अंगणवाडी सेविकांमार्फत ठोस उपाययोजना कोण करणार? हा प्रश्न निरुत्तरीत आहे. (प्रतिनिधी)
दुसऱ्या फेरीत तपासणी करू
निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. नसरुद्दीन पटेल यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, पथकांचे काम चांगलेच आहे. पथक अंगणवाड्यांमध्ये गेले होते; पण बालके हजर नव्हती. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. प्रत्येक तीन महिन्याला तपासणी होेते. त्यामुळे दुसऱ्या फेरीत वंचित बालकांची अवश्य तपासणी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
तपासणी केलेली व वंचित बालके
तालुकाअंगणवाड्या तपासलेवंचित
बीड५३७४९१४७२६८३४
परळी२३८२७४१४९९२३
अंबाजोगाई२९०२६५२६२०७९०
माजलगाव२७८२९३८९२१७६९
गेवराई३७६३८३४३३३२८३
केज३१७२८३४८१४४३४
पाटोदा१७६१३३७३१०५९१
धारुर१३०१२२५९७८७८
वडवणी९६१०९३३८२१६
शिरुर१८११३३६८५१२८