सत्तावीस वर्षानंतर भूसंपादन रद्द
By Admin | Published: July 22, 2016 12:25 AM2016-07-22T00:25:37+5:302016-07-22T00:36:24+5:30
उस्मानाबाद : याचिकाकर्ती पुतळाबाई मुळे यांच्या शेतीचे केलेले भूसंपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला व न्या. के. के. सोनवणे यांच्या खंडपीठाने रद्द केले.
उस्मानाबाद : याचिकाकर्ती पुतळाबाई मुळे यांच्या शेतीचे केलेले भूसंपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला व न्या. के. के. सोनवणे यांच्या खंडपीठाने रद्द केले. संबंधित जमीन याचिकाकर्ती पुतळाबाई यांच्या नावहक्कात करण्याचा आदेशही खंडपीठाने दिला. तब्बल २७ वर्षांनंतर मुळे यांना न्यायालयाच्या आदेशामुळे न्याय मिळाला.
कळंब तालुक्यातील बहुला येथील शेतकरी भीमराव मुळे यांची शेतजमीन १९८८ साली शासनाने अधिग्रहीत करण्याची कार्यवाही केली. भूम येथील विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी अवॉर्ड जारी केला. याविरोधात याचिकाकर्ती पुतळाबाई मुळे यांनी १९८८ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने प्रकरणात स्थगिती आदेश दिला होता.
२००१ मध्ये याचिकाही फेटाळण्यात आली. परंतु शासनाने सदर शेतजमिनीचा ताबा मुळे कुटुंबियांना दिला नाही. तेव्हापासून शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी न्यायालयीन लढा सुरु होता. भूमी अधिग्रहण प्रक्रियेला मुळे व इतरांनी अॅड. अजिंक्य रेड्डी व अॅड. सुधीर मुळे यांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. (प्रतिनिधी)