लॅपटॉप चोरी करणारे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:53 AM2017-09-29T00:53:02+5:302017-09-29T00:53:02+5:30
शहरात लॅपटॉप केअर या दुकानातून लॅपटॉपसह अन्य साहित्याची चोरी करणाºया पाच संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात लॅपटॉप केअर या दुकानातून लॅपटॉपसह अन्य साहित्याची चोरी करणाºया पाच संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २४ लॅपटॉप, तीन एलसीडी मॉनिटर असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरातील जुना जालना भागातील उड्डाण कॉम्प्लेक्समधील लॅपटॉप केअर या दुकानात १७ सप्टेंबर रोजी चोरी झाली होती. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, चोरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. शहरातील संशयित रिजवान उस्मान शेख (रा. युसूफ कॉलनी) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना २५ सप्टेंबर रोजी मिळाली होती. त्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने रिजवान शेख यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने संशयित शेख मोईस शेख रफिक, शेख समीर (दोघे रा.दु:खीनगर), शेख इम्रान मोईद्दीन, जावेद यासिन मनसुरी (दोघे, रा. नालासुपारा, मंबई) यांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने नालासोपारा, मीरा भार्इंदर, डोंगरी या भागात शोध घेऊन संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. चोरट्यांनी सर्व लॅपटॉप मुंबई डोंगरी भागातील महंमद अली रोड परिसरातील चोरबाजारात विक्री केले.