खुलताबाद तालुक्यात कोरोनाची लस घेण्यासाठी मोठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:05 AM2021-05-08T04:05:01+5:302021-05-08T04:05:01+5:30
गदाणा, वेरूळ व बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी परिसरातील गावांमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ...
गदाणा, वेरूळ व बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी परिसरातील गावांमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गदाणा येथील आरोग्य केंद्र परिसरात तर गर्दीमुळे पोलिसांना बोलावण्यात आले होते. बाजार सावंगी येथील केंद्रावर ही मोठी गर्दी झाली होती. नंतर लस संपल्याने नागरिकांना परत जावे लागले. लसीचे महत्त्व पटू लागल्याने लस टोचून घेणाऱ्यांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. खुलताबाद येथील केंद्रावर लस नसल्याचा फलक असल्याने अनेकांचा हिरमोड झाला. ग्रामीण भागातील नागरिक दहा ते पंधरा कि. मी. येऊन त्या ठिकाणी, वयोमानाने नंबर लावून बसू शकत नाहीत. त्यातच मे महिन्याचा कडक उन्हाळा असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे गावागावात लसीकरण मोहीम सुरू करण्यात यावी, अशी मागणी संदीप निकम यांनी केली आहे.
फोटो कॅप्शन : बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी उसळलेली गर्दी.