पैठण येथे मुलांच्या वसतिगृहातील जेवणात आढळल्या चक्क अळ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:07 AM2018-12-26T00:07:29+5:302018-12-26T00:08:15+5:30
पैठण येथील उद्यान रोडवरील सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय मुलांच्या वसतिगृहातील मुलांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये चक्क अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : पैठण येथील उद्यान रोडवरील सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय मुलांच्या वसतिगृहातील मुलांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये चक्क अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली.
आम्हाला दररोज निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी केली होती. या आधारे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सदर वसतिगृहात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता जेवणात अळ्या आढळून आल्या. यावरुन विद्यार्थ्यांसमवेत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
निवासाची सुविधा, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याचेही आढळून आले. रोज सकाळी नाश्त्यासाठी नासाडीयुक्त फळे, भाज्या देण्यात येतात. यामुळे येथील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून या अगोदरही वसतिगृहातील असुविधा व निकृष्ट जेवणामुळे होत असलेल्या त्रासाची विद्यार्थ्यांनी तहसीलदार महेश सावंत यांच्यासमोर रडत रडत आपली कैफियत मांडली होती. या प्रकाराने संतप्त झालेल्या तहसीलदारांनी विद्यार्थ्यांसमोरच वसतिगृहातील उपस्थित कर्मचाºयांची चांगलीच कानउघाडणी केली होती. परंतु यानंतर पुढे कोणतीही कारवाई झाली नसल्याने हा प्रकार मागील बºयाच दिवसांपासून सर्रासपणे सुरू आहे.
याकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देऊन बेजबाबदार कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्यात यावी, नसता आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छावा क्रांतीवीर सेना शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल राऊत यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन लक्ष घालण्याची मागणी केली.