लासुरात कांद्याला ४६०० रुपये भाव

By Admin | Published: August 6, 2015 12:24 AM2015-08-06T00:24:03+5:302015-08-06T01:02:17+5:30

लासूर स्टेशन : येथील कांदा मार्केटमध्ये बुधवार, ५ आॅगस्ट रोजी चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल या उच्चांकी दराने कांदा विक्री झाला,

Lassurat onion costs Rs 4600 | लासुरात कांद्याला ४६०० रुपये भाव

लासुरात कांद्याला ४६०० रुपये भाव

googlenewsNext


लासूर स्टेशन : येथील कांदा मार्केटमध्ये बुधवार, ५ आॅगस्ट रोजी चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल या उच्चांकी दराने कांदा विक्री झाला, तर सरासरी तेहतीसशे रुपये भाव शेतकऱ्यांच्या हातात पडला आहे. कांद्याची गेल्या बाजाराच्या तुलनेत चाळीस टक्के भाववाढ झाली आहे.
येथील कांदा मार्केटमध्ये बुधवारी दोन हजार चारशे गोणी कांद्याची आवक झाली होती. गेल्या रविवारी तीन हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल या दराने कांदा विक्री झाला होता. बुधवारी झालेल्या बाजारात चार हजार सहाशे रुपये भाव मिळाला आहे.
आज रोजी झालेल्या लिलावात एक हजार रुपयापासून चार हजार सहाशे रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल कांद्याला भाव मिळाला आहे. सरासरी भाव तीन हजार तीनशे रुपये असा होता. चांगल्या कांद्याला चार हजार दोनशे रुपये भाव जास्त प्रमाणात दिला गेला आहे.

Web Title: Lassurat onion costs Rs 4600

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.