गैरहजर उमेदवारांना आज शेवटची संधी

By Admin | Published: June 6, 2014 11:25 PM2014-06-06T23:25:02+5:302014-06-07T00:26:47+5:30

हिंगोली : राज्य राखीव पोलिस गट क्र. १२ च्या आस्थापनेवरील पोलिस शिपायांच्या १०३ रिक्त जागांसाठी ३ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

The last chance for the absent candidates today | गैरहजर उमेदवारांना आज शेवटची संधी

गैरहजर उमेदवारांना आज शेवटची संधी

googlenewsNext

हिंगोली : राज्य राखीव पोलिस गट क्र. १२ च्या आस्थापनेवरील पोलिस शिपायांच्या १०३ रिक्त जागांसाठी ३ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत काही कारणास्तव गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना शेवटची संधी म्हणून ७ जून रोजी भरतीसाठी हजर राहता येणार आहे.
ज्या उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केलेले आहेत. परंतु ते उमेदवार ३ ते ६ जूनपर्यंत कागदपत्र पडताळणी व शारीरिक मोजमापासाठी गैरहजर राहिलेले आहेत. अशा उमेदवारांना शेवटची संधी म्हणून ७ जून रोजी सकाळी ६ वाजता राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ हिंगोली येथे पोलिस भरती मैदानावर हजर राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. तसेच कागदपत्रे पडताळणी व शारीरिक चाचणीत जे उमेदवार पात्र आहेत. त्यांची ८ ते ११ जून दरम्यान मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. सर्व पात्र उमेदवारांनी त्यांना ठरवून दिलेल्या दिवशी मैदानी चाचणीस वेळेवर सकाळी ६ वाजता राज्य राखीव पोलिस बल गटाच्या मैदानावर उपस्थित रहावे, असे आवाहन पोलिस भरतीप्रमुख एस. बी. घुगे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The last chance for the absent candidates today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.