‘त्या’ व्यापाऱ्यांना अखेरची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:27 AM2018-08-05T00:27:24+5:302018-08-05T00:28:35+5:30

व्हॅट (मूल्यवर्धित कर)मध्ये नोंदणी असणारे ६६६ व्यापारी नंतर जीएसटी (वस्तू व सेवाकर)मध्ये समाविष्ट झालेच नाहीत. या व्यापा-यांची यादीच केंद्रीय जीएसटीएने राज्य जीएसटीकडे सोपविली आहे. त्यांना रिर्टन दाखल करण्यासाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे.

The last chance for 'those' traders | ‘त्या’ व्यापाऱ्यांना अखेरची संधी

‘त्या’ व्यापाऱ्यांना अखेरची संधी

googlenewsNext
ठळक मुद्देनोटिसा बजावल्या : व्हॅटमधून जीएसटीत ६६६ व्यापारी समाविष्ट झालेच नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : व्हॅट (मूल्यवर्धित कर)मध्ये नोंदणी असणारे ६६६ व्यापारी नंतर जीएसटी (वस्तू व सेवाकर)मध्ये समाविष्ट झालेच नाहीत. या व्यापा-यांची यादीच केंद्रीय जीएसटीएने राज्य जीएसटीकडे सोपविली आहे. त्यांना रिर्टन दाखल करण्यासाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे.
जीएसटीएनमध्ये नोंदणी केलेले, पण मागील वर्षभर एकही विवरणपत्र न दाखल करणाºया १२,६३१ व्यापाºयांना नोटिसी बजावण्यात आल्या आहेत. यासाठी औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्यात स्टेट जीएसटी विभागातर्फे विशेष मोहीम घेण्यात आली. विशेष म्हणजे तब्बल ९८ विक्रीकर निरीक्षकांनी शहरातील शोरूमपासून ते ग्रामीण भागातील किराणा दुकानापर्यंत जाऊन प्रत्यक्षात ४,८७३ जणांच्या हातात नोटीस दिली. औरंगाबाद जिल्ह्यात २२,१३७ व्यापारी, जालना ४,९५८ व बीड जिल्ह्यातील ५,८१७ व्यापाºयांनी जीएसटीएनमध्ये आपली नोंदणी केली आहे. मात्र, यापैकी १२,६३१ करदाते असे आहेत की, त्यांनी मागील वर्षभरात एकही जीएसटीआर-३ बी विवरणपत्र दाखल केले नाही. त्यांच्याकडून विवरणपत्र दाखल करून घेण्यासंबंधी पाठपुरावा करण्यात येत आहे. मागील आठवड्यात जीएसटीएनकडून ६६६ व्यापाºयांची नवीन यादी स्टेट जीएसटी विभागाला प्राप्त झाली आहे. यात व्हॅट समावेश असणारे, पण नंतर जीएसटी करप्रणालीत स्थलांतरित न झालेले औरंगाबाद जिल्ह्यातील ४१६, जालना १२९, तर बीड येथील १२१ व्यापारी आहेत. या व्यापाºयांकडे पूर्वी व्हॅट नंबर होता. त्यानंतर जीएसटीत समावेश होण्यासाठी त्यांना जीएसटी प्रोव्हिजनल आयडी देण्यात आला होता; मात्र यासाठी लागणारा पार्ट बी फॉर्म भरलाच नाही. हे जीएसटीएनच्या आॅनलाईन पोर्टलने शोधून काढले. आता या व्यापाºयांना यासाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे. ६ ते १० आॅगस्टदरम्यान यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या ६६६ व्यापाºयांशी एसजीएसटीचे अधिकारी संपर्क साधत आहेत. या व्यापाºयांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय २१ जुलै रोजी जीएसटी कौन्सिलच्या २८ व्या बैठकीत घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
मदत केंद्र सुरू
स्टेट जीएसटी विभागाने मदत केंद्र सुरू केले आहे. यासाठी १ उपायुक्त, ५ अधिकार व २ निरीक्षकांचे पथक तयार करण्यात आले आहे. त्यांच्याद्वारे ६६६ व्यापाºयांशी संपर्क करण्यात येत आहे. ६ ते १० आॅगस्टदरम्यान त्यांना जीएसटीत स्थलांतरित होण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

Web Title: The last chance for 'those' traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.