सवलतीच्या दरात रजिस्ट्रेशनसाठी आज अखेरचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:32 AM2017-12-02T00:32:56+5:302017-12-02T00:39:21+5:30
लोकमत समूहातर्फे १८ डिसेंबर रोजी होणा-या औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये आपला प्रवेश सवलतीच्या दरात निश्चित करण्यासाठी उद्या, शनिवारी अखेरचा दिवस आहे.
औरंगाबाद : लोकमत समूहातर्फे १८ डिसेंबर रोजी होणा-या औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये आपला प्रवेश सवलतीच्या दरात निश्चित करण्यासाठी उद्या, शनिवारी अखेरचा दिवस आहे. धावपटूंमध्ये लोकप्रिय ठरलेल्या या महामॅरेथॉनमध्ये हजारो धावपटू, नागरिक, महिला आणि युवा वर्गाने आपला प्रवेश आधीच निश्चित केला आहे.
दोन वर्षांपासून सातत्याने जबरदस्त कामगिरी करणा-या ज्योती गवते हिच्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारे देश व परदेशांतील धावपटू या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.
पूर्ण महाराष्ट्रातच या महामॅरेथॉनसाठी धावपटू जोरदार तयारी करीत असून, सर्व मैदाने फुलून गेली आहेत.
गतवर्षीप्रमाणेच यंदाही महामॅरेथॉनला उदंड प्रतिसाद मिळणार असल्याचा संयोजकांचा विश्वास आहे.
वैयक्तिक आणि सामूहिक नोंदणीवरही नागरिक, धावपटू, कंपन्यांतील कर्मचारी, महिला यांचा मोठ्या प्रमाणावर कल आढळून आलेला आहे. यंदा पोलीस, आर्मी आणि एअरफोर्समधील धावपटूंसाठी दिले जाणारे बक्षीसही या महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरणार
आहे.
महामॅरेथॉन २१ कि.मी. अर्धमॅरेथॉन, फॅमिली रन (३ कि.मी.), ५ कि.मी. फन रन, १० कि.मी., २१ कि.मी. आणि डिफेन्स २१ कि.मी. अशा अंतराची असणार
आहे.
२१ कि.मी. अर्धमॅरेथॉन आणि १० कि.मी. अंतराच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाºया धावपटूंना टी-शर्ट, गुडी बॅग, प्रमाणपत्र, फिनिशर मेडल, टायमिंग चीप व ब्रेकफास्ट देण्यात येणार आहे. ५ कि.मी. अंतरासाठी टी-शर्ट, गुडी बॅग, मेडल व ब्रेकफास्ट, तर ३ कि.मी. अंतरासाठी गुडी बॅग, मेडल व ब्रेकफास्ट असणार आहे. या सर्व सुविधा २ डिसेंबरपर्यंत आपला प्रवेश निश्चित करणा-यांसाठीच असणार आहेत.