ब्रिटिशकालीन पूल मोजतोय अखेरच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:04 AM2021-07-09T04:04:26+5:302021-07-09T04:04:26+5:30

देवगांव रंगारी : कन्नड तालुक्यातील देवगांव रंगारी येथील येळगंगा नदीवर असलेला ब्रिटिशकालीन दगडी पूल अखेरच्या घटका मोजत असून, तो ...

The last factor counting the British-era bridge | ब्रिटिशकालीन पूल मोजतोय अखेरच्या घटका

ब्रिटिशकालीन पूल मोजतोय अखेरच्या घटका

googlenewsNext

देवगांव रंगारी : कन्नड तालुक्यातील देवगांव रंगारी येथील येळगंगा नदीवर असलेला ब्रिटिशकालीन दगडी पूल अखेरच्या घटका मोजत असून, तो केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. शंभर वर्षे उलटलेल्या या पुलाचे आयुष्यमान संपलेले असताना, तसेच तो धोकादायक असतानाही त्यावरून अवजड वाहतूक सुरू आहे. प्रशासनाला या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करायला तसेच त्यावर उगवलेली झाडेझुडपे काढायलाही वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ऐतिहासिक असलेला देवगांव रंगारी येथील येळगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन मोठा पूल हा औरंगाबाद ते नाशिक मार्गाला जोडणारा एक दुवा आहे. अनेक घटनांचा साक्षीदार असलेल्या पुलाने महापुराचे असंख्य धक्के सहन केले आहेत. चिरेबंंदी दगडातला हा पूल वास्तुकलेचा एक आदर्श नमुना आहे. आजघडीला ११० वर्षे होऊनही त्याचे तेज कमी झालेले दिसत नाही. मात्र, इतक्या वर्षांचा कालावधी पाहता तो तांत्रिकदृष्ट्या वाहतुकीस योग्य आहे की नाही? याची तपासणी होणे गरजेचे आहे. औरंगाबादहून नाशिक, मालेगावकडे जाणारी वाहने याच मार्गाने जातात. तसेच जगप्रसिद्ध वेरुळ लेणी, शिर्डी, भद्रमारुती देवस्थान, म्हैसमाळला जाण्यासाठी पर्यटकांची नेहमी या मार्गावर गर्दी असते. याच मार्गाने डिझेल, पेट्रोल, राॅकेल टँकर मनमाडकडून नांदगांवमार्गे जातात. अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने पुलाला हादरे बसत आहेत. शिवाय पुलाच्या चिरेबंदी दगडांत मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे उगवली असून, दोन दगडांमधील सांधे उखळले आहेत. वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या पुलाचे कठडे पडल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. बऱ्याच ठिकाणी पुलाचे कठडे आपोआप पडत आहेत. वाहनधारकांना पुलावरून जाताना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालविण्याची वेळ आली आहे. या ऐतिहासिक पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

चौकट

तीन वर्षांपूर्वीच ब्रिटिश सरकारने बजावली नोटीस

देवगांव रंगारी येथील येळगंगा नदीवर ब्रिटिशांनी अंदाजे शंभर ते दीडशे वर्षांपूर्वी दगड व चुन्याचा वापर करून हा पूल बांधला आहे. पुलाचे आयुष्य संपल्याने तीन वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने नोटीस बजावली आहे. मात्र, तरीसुद्धा प्रशासनाला व संबंधित विभागाला अद्यापपर्यंत जाग आलेली नाही.

फोटो : ब्रिटिशकालीन येळगंगा नदीवर बांधलेला दगडी पूल.

080721\img-20210708-wa0019.jpg

देवगांव रंगारी येथील येळगांगा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल मोजतोय अखेरच्या घटका

Web Title: The last factor counting the British-era bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.