सखी मंचच्या सदस्यता नोंदणीचे शेवटचे काही दिवस
By Admin | Published: March 17, 2016 12:25 AM2016-03-17T00:25:48+5:302016-03-17T00:26:57+5:30
औरंगाबाद : लोकमत सखी मंचच्या सदस्यांना २० मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सारेगम फेम विश्वजित बोरवणकर सोबत ‘डान्स व गाण्या’चा आनंद लुटण्याची संधी आहे.
औरंगाबाद : लोकमत सखी मंचच्या सदस्यांना २० मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सारेगम फेम विश्वजित बोरवणकर सोबत ‘डान्स व गाण्या’चा आनंद लुटण्याची संधी आहे. एक्सपर्ट प्रस्तुत ‘सखी जल्लोष २०१६ मध्ये जुन्या व नवीन गाण्याचे धमाल सादरीकरण होणार आहे. कार्यक्रम फक्त सखी मंचच्या सदस्यांसाठीच असून, लोकमत लॉन लोकमत भवन येथे होणार आहे.
सखींवर बक्षिसांचा वर्षभर वर्षाव होणार आहे. म्हणून त्वरित सखी मंचच्या सदस्या होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाला सखी मंच-२०१६ चे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. प्रवेश मागील गेटने देण्यात येईल. सदस्यता नोंदणी पुढील ठिकाणी स. १० ते सायं. ५ या वेळेत सुरू आहे. नावनोंदणीसाठी जन्मतारखेचा पुरावा आवश्यक नाही. १. लोकमत भवन- रीगल लॉन, जालना रोड, प्रवेश समोरील गेटने. २. मिलन मिठाई- उस्मानपुरा, मछली खडक़ ३. सुंदर टी कंपनी- विमलनाथ जैन मंदिराजवळ, जाधवमंडी. ४. नूतन अडसरे- ९८२३९६६२५४, आर. एम. २५६, जयभवानी चौक, कोलगेट कंपनीसमोर, बजाजनगर. ६. पैठणी आर्ट गॅलरी- रामायणा कल्चरल हॉलशेजारी, उल्कानगरी. (वेळ स. ११ ते ३ व सायं. ६ ते ९. (सोमवार बंद) ११. श्री साई हॅण्डरायटिंग- ८७९६२३७३६८ एसबीओए पब्लिक स्कूलसमोर, मयूर पार्क, जळगाव रोड. अधिक माहितीसाठी लोकमत भवन येथे ९८५०४०६०१७ या क्रमांकावर संपर्क साधावा. नावनोंदणी करण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहेत. सदस्य झाल्यावर प्रत्येक सखीला रु. ५०५० च्या भेटवस्तू मोफत मिळणार आहेत. यामध्ये एक ग्रॅम सोन्याची चेन, कॅसरोल सेट, फिटनेस बुक, बांगड्या, आकर्षक कर्णफुले मिळतील. याशिवाय लकी ड्रॉद्वारे महिंद्रा गस्टो आणि सोन्याची ठुशी जिंकण्याची संधी मिळणार आहे.
बजाजनगरात ‘सखी सुगरण कुकरी शो’
‘सखी सुगरण कुकरी शो’ बजाजनगरातील महावीर भवन, जैन स्थानक प्लॉट नं.३७४, अॅक्सिस बँकेमागे, आंबेडकर चौकात १७ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता सखी मंच सदस्यांसाठी होत आहे. यात वैविध्यपूर्ण पदार्थ ई-टीव्ही मेजवानी किचन क्वीन स्पर्धेतील विजेत्या स्नेहा वेद यांच्याकडून शिकण्याची संधी आहे. तेथे दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत सदस्य नोंदणी होईल.