आॅनलाईन सातबाराचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:53 PM2017-10-31T23:53:38+5:302017-10-31T23:53:42+5:30
तालुक्यात १५ हजार १०८ सातबारांपैकी १४ हजार २०० सातबारा आॅनलाईन झाल्या आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच शेतक-यांना आॅनलाईन सातबारा उपलब्ध होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ : तालुक्यात १५ हजार १०८ सातबारांपैकी १४ हजार २०० सातबारा आॅनलाईन झाल्या आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच शेतकºयांना आॅनलाईन सातबारा उपलब्ध होणार आहेत.
शासनाने संगणकीकृत सातबारा देण्याचा निर्णय घेतला़ सोनपेठ महसूल प्रशासनाने सातबारा संगणकीकृत करण्यासाठी तालुकाभर मोहीम राबविली होती. तालुक्यातील सातबाराचा डाटा अपलोड करण्यात आला. सातबारा तयार करुन त्याची प्रिंट काढून गावामध्ये जावून चावडी वाचन करण्यात आले. तसेच शेतकºयांकडून आलेल्या सातबारामधील दुरुस्त्या, आक्षेप नोंदविण्यात आले होते. तहसील प्रशासनाने शेतकºयांनी सादर केलेल्या आक्षेप व दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे़ तालुक्यातील ४८ गावांमध्ये दुरूस्तीचे काम १०० टक्के झाले आहे. फक्त डिघोळ, आवलगाव, निळा, शिर्शी या चार गावातील सातबारा अपलोडचे काम ८० टक्के झाले आहे. तर तालुक्यातील ९८ टक्के सातबारा दुरुस्तीसह आॅनलाईन लपलोडचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच सातबारा मिळणार आहेत़