तूर खरेदीस शेवटचे तीन दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:42 AM2017-08-29T00:42:20+5:302017-08-29T00:42:20+5:30
जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकºयांचीही तूर खरेदी करण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर प्रशासनाने मागील काही दिवसांपासून खरोखरच किती शेतकºयांची तूर शिल्लक आहे याची चाचपणी केली. अनेकांची नोंदणीच बोगस तर काहींनी तूर विकल्याचे समोर आले आहे. उर्वरितांची तूर खरेदी करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला. मात्र यासाठी तीनच दिवस शिल्लक आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकºयांचीही तूर खरेदी करण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर प्रशासनाने मागील काही दिवसांपासून खरोखरच किती शेतकºयांची तूर शिल्लक आहे याची चाचपणी केली. अनेकांची नोंदणीच बोगस तर काहींनी तूर विकल्याचे समोर आले आहे. उर्वरितांची तूर खरेदी करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला. मात्र यासाठी तीनच दिवस शिल्लक आहेत.
हिंगोली जिल्ह्यात तूर खरेदीचा प्रश्न सुरुवातीपासूनच चिघळलेला होता. त्यातही हिंगोली जिल्ह्यात तर शेतकºयांनी मोंढ्यात मोठी गर्दी केल्याने टोकन पद्धत करून टप्प्या-टप्प्याने तूर मागवावी लागली. अनेकदा केंद्रही बंद पडले. काँग्रेसचे खा.राजीव सातव यांनी आंदोलनही केले. शिवसेनेनेही आंदोलनाचा इशारा दिला होता. राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनीही मोंढा बंद असल्याने तेथे भेट दिली होती. तर भाजपचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी तूर खरेदीच्या मुदतवाढीसाठी प्रयत्न केले. ही मुदत येत्या ३0 आॅगस्टला संपणार आहे. तोपर्यंत तरी तूर खरेदी होते की नाही, हा गंभीर प्रश्न आहे.
प्रशासनाने नोंदणीकृत शेतकºयांची माहिती घेतली तेव्हा जिल्ह्यात ५४ हजार क्ंिवटल तूर शिल्लक असल्याची माहिती मिळाली होती. यात सर्वाधिक ४२४६ शेतकºयांची ४६ हजार ५४८ क्विंटल तूर होती. त्यानंतर वसमतच्या १४२ जणांची १९७१, जवळा बाजारच्या ४१६ जणांची ६ हजार क्ंिवटल तूर होती. केवळ टोकन दिलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदी केल्याने या शेतकºयांची तूर तशीच शिल्लक राहिली होती. ती खरेदीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविल्यावर मंजुरीही मिळाली. मध्यंतरी खाजगी बाजारातही पाच हजारांपर्यंत भाव मिळू लागल्याने अनेकांनी तूर विकली. त्यानंतर प्रशासनाने तलाठ्यांमार्फत तपासणी केली तर ३0 टक्के शेतकºयांची नोंदच बोगस आढळली. तर अनेकांनी तूर विकून टाकली. केवळ ५00 जणांनी घोषणापत्र दिले होते.
त्यातील काहींचेही आकडे अवास्तव वाटत असल्याने प्रशासन पहिल्या टप्प्यात कोणताही संशय न उरणाºया शेतकºयांची तूर खरेदी सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तीनच दिवस शिल्लक आहेत.