...अखेर अर्धवेळ शाळांचा ठराव
By Admin | Published: March 17, 2016 12:00 AM2016-03-17T00:00:52+5:302016-03-17T00:04:48+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील शाळांच्या वेळा उन्हाळ्यात बदलण्यात येतात. यंदाही अर्धवेळ शाळा करण्याचा ठराव जि.प.च्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
हिंगोली : जिल्ह्यातील शाळांच्या वेळा उन्हाळ्यात बदलण्यात येतात. यंदाही अर्धवेळ शाळा करण्याचा ठराव जि.प.च्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
सभापती अशोक हरण यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीस गजानन देशमुख, रंगराव कदम, राजाभाऊ मुसळे आदी जि.प.सदस्यांसह शिक्षणाधिकारी गंगाधर जाधव यांची उपस्थिती होती. देशमुख यांनी अर्धवेळ शाळांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे आज ठराव घेवून १८ मार्चपासून अर्धवेळ शाळा सुरू करण्यात येतील, असे सांगण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यात शिक्षकांची ६२ पदे रिक्त आहेत. संचमान्यतेनंतर ही पदे १00 जाण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षणाधिकारी जाधव यांनी दिली. त्यावर एकतर नवीन भरती करा अन्यथा आंतरजिल्हा बदलीवर हिंगोलीत येण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षकांना संधी द्या, अशी मागणी देशमुख यांनी केली.
सर्व शिक्षा अभियानातील कोणीही अधिकारी-कर्मचारी शिक्षण समितीच्या बैठकीला हजर राहात नसल्याचा मुद्दाही चर्चेत आला. त्यावर सभापतींची परवानगीही घेतली नसल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांकडून सात दिवसांत खुलासा मागविण्यास सांगण्यात आले. तर त्यानंतर कारवाईचा निर्णय होणार आहे. यू-डायसमध्ये चुकीची माहिती दिल्याने सेनगाव तालुक्यातील शिवनी येथे चार शाळाखोल्या पाडल्या तरीही तशी नोंद नसल्याचे व तपोवनला दोन खोल्यांची गरज असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याची अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा तपासणी करण्यास सांगण्यात आले.