लासुरगावच्या वेशीला डागडुजीची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:06 AM2021-06-26T04:06:02+5:302021-06-26T04:06:02+5:30
लासुरगावची वेस ही निजाम राजवटीत बांधली असल्याचा अंदाज आहे. औरंगाबादमध्ये उपलब्ध असलेल्या ५२ दरवाजांनंतर ग्रामीण भागात सुस्थितीत असलेले ...
लासुरगावची वेस ही निजाम राजवटीत बांधली असल्याचा अंदाज आहे. औरंगाबादमध्ये उपलब्ध असलेल्या ५२ दरवाजांनंतर ग्रामीण भागात सुस्थितीत असलेले परिसरातील हे एकमेव प्रवेशद्वार असल्याचे नागरिक सांगतात. हे प्रवेशद्वार सिमेंट विरहित दगडी बांधकामात बांधलेले आहे. यात चुना, गूळ, वाळूचे मिश्रण वापरलेले आहे.
ग्रामपंचायती अस्तित्वात आल्यानंतर या वेशीचे संवर्धन करण्यात आले. या प्रवेशद्वारावर नंतर थोडेसे विटांचे बांधकाम करून त्यावर ग्रामपंचायत कार्यालय स्थापन करण्यात आले. संपूर्ण गावचा कारभार या इमारतीतून चालवण्यात येत होता. लासुरगावचे प्रथम सरपंच स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय चांदमलजी वर्मा यांनी याच कार्यालयातून गावची धुरा सांभाळली. त्यानंतर कित्येक वर्षे ग्रामपंचायत येथेच होती.
ही वेस एखाद्या किल्ल्याचे प्रवेशद्वार वाटावे, अशी भव्य असून त्यात सुरक्षारक्षकांना बसण्यासाठी पडवीही तयार केलेली आहे. या वेशीला डागडुजीची आवश्यकता असून, यामुळे निश्चितच या वेशीचे आयुष्य वाढणार आहे. कोट...
मी आता नव्वदीच्या उंबरठ्यावर आहे. माझे संपूर्ण आयुष्य लासुरगावात गेले. ही वेस शिवकाळात तयार केलेली असावी, असे आमचे वाडवडील सांगत होते. आजही ही वेस चांगल्या स्थितीत आहे.
-तात्याराव लहानू शेलार, लासुरगाव
फोटो :
250621\img_20210625_125728.jpg
तात्याराव लहानु शेलार लासुरगाव