बाहेरच्या आमदारांचाही लातूरला मिळाला निधी

By Admin | Published: March 19, 2016 12:36 AM2016-03-19T00:36:14+5:302016-03-19T00:56:38+5:30

हणमंत गायकवाड , लातूर लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा आणि दोन विधान परिषदेतील आमदारांनी चालू आर्थिक वर्षात १६ कोटींच्या कामांना मंजुरी घेतली असून,

Latur gets funds from outside MLAs | बाहेरच्या आमदारांचाही लातूरला मिळाला निधी

बाहेरच्या आमदारांचाही लातूरला मिळाला निधी

googlenewsNext


हणमंत गायकवाड , लातूर
लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा आणि दोन विधान परिषदेतील आमदारांनी चालू आर्थिक वर्षात १६ कोटींच्या कामांना मंजुरी घेतली असून, बाहेर जिल्ह्यातील सहा आमदारांनीही १ कोटी २३ लाख ८९ हजारांचा निधी दिला आहे़ जलसंधारणाच्या कामाबरोबर ग्रंथालय आणि शैक्षणिक साहित्यासाठी हा निधी देण्यात आला आहे़ गतवर्षीही सहा आमदारांनी ४१ लाख ४४ हजारांचा निधी दिला होता़ यावर्षी १ कोटी २३ लाख ८९ हजारांचा निधी मिळाला आहे़
विधान परिषदेतील आमदार शरद रणपिसे यांनी गतवर्षी ३ लाखांचा निधी दिला होता़ तर आमदार सतीश चव्हाण यांनी ५ लाख, भाई गिरकर यांनी ३ लाख, मुजफ्फर हुसेन यांनी ५ लाख आणि राणाजगजितसिंह पाटील यांनी ४ लाख ९८ हजारांचा निधी दिला होता़ यातील बहुतांश निधी जलसंधारणाच्या कामासह शैक्षणिक उपक्रमांना देण्यात आला होता़ यंदा २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी डॉ़ नीलमताई गोऱ्हे, महादेव जानकर, सतीश चव्हाण, शरद रणपिसे, भाई जयंत पाटील, भाई गिरकर यांनी निधी दिला आहे़ या सहा आमदारांनी १ कोटी २३ लाख ८९ हजार रुपयांचा निधी लातूरच्या विकास कामांसाठी दिला आहे़ त्यांनी सुचविलेल्या विकास कामांची यादीही मंजूर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी बी़एसक़ोलगणे यांनी दिली़ ग्रंथालय व ग्रंथालयातील साहित्य खरेदी तसेच जलयुक्त शिवार योजनेसाठी हा निधी मिळाला असल्याचेही कोलगणे यांनी सांगितले़ बाहेर जिल्ह्यातील आमदारांचा निधी मिळत असल्याने लातूरच्या विकास कामासाठी मदत होत आहे.

Web Title: Latur gets funds from outside MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.