लातुरकर म्हणतात भाजपचाच अडथळा!

By Admin | Published: November 12, 2014 12:17 AM2014-11-12T00:17:01+5:302014-11-12T00:26:00+5:30

लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापन केले असून, बुधवारी विश्वासदर्शक ठरावाला हे शासन सामोरे जात आहे़

Laturkar says BJP's obstacle! | लातुरकर म्हणतात भाजपचाच अडथळा!

लातुरकर म्हणतात भाजपचाच अडथळा!

googlenewsNext


लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापन केले असून, बुधवारी विश्वासदर्शक ठरावाला हे शासन सामोरे जात आहे़ दरम्यान, राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यावा की, शिवसेनेला सहभागी करावे असा पेच निर्माण झाला आहे़ त्या अनुषंगाने सर्व्हेक्षणाद्वारे लातूर शहरातील शंभर नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले असता, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही़ शिवाय हा पाठिंबा अयोग्य असून, भाजप सेनेच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे़ त्यामुळे सेनेला शासनात सहभागी करुन घ्यावे, असे मत नोंदविले आहे़ सध्यातरी या भूमिकेला भाजपकडून अडथळा होत असल्याचे मत नागरिकांनी सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे़ ७१ टक्के लोकांनी भाजपकडून अडथळा होत असल्याचे म्हटले असून, २९ टक्के लोकांनी सेना जबाबदार असल्याचे म्हटले आहे़ तर ७७ टक्के लोकांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याला विरोध दर्शविला आहे़ केवळ २३ टक्के लोकांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास समर्थन दिले आहे़
भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची गेल्या २५ वर्षांपासूनची युती होती़ ही युती नैसर्गिक आहे़ शिवाय विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने या दोन्ही पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे़
पहिल्या दोन सर्वाधिक संख्याबळ असलेल्या या दोनच पार्ट्या आहेत़ त्यामुळे या दोन्ही पक्षाचे मिळून सरकार स्थापन व्हावे, असे मत ७६ टक्के लोकांचे आहे़ केवळ २४ टक्के लोकांनी भाजप सेनेचे सरकार होऊ नये असे मत नोंदविले आहे़
सरकारमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने दोन्हीही पक्षाकडून बोलणी सुरु आहे़ परंतु त्यात सर्वाधिक अडथळा भाजपकडून होत असल्याचे सर्व्हेक्षणात व्यक्त झालेले मत आहे़ ७१ टक्के लोक भाजपाची भूमिका युती होण्यास अडथळ्याची ठरत असल्याचे म्हटले आहे़ तर २९ टक्के लोकांनी नैसर्गिक युतीला सेनेकडून अडथळा येत असल्याचे म्हटले आहे़
अल्प मतातील सरकार बहुमतात येण्यासाठी भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा घेणे योग्य नसल्याचे मत ७७ टक्के लोकांनी नोंदविले आहे़ केवळ २३ टक्के लोकांनी पाठिंबा घेण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे़ तरीही भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतल्यास सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही़ मध्यंतरीच हे सरकार कोसळेल, असे लातुरकरांना वाटते़ १०० पैकी ७३ टक्के लोकांना सरकार टिकणार नाही असे वाटत आहे़ केवळ ८ टक्के लोकांनी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे़ तर १९ टक्के लोकांनी या बाबत काही सांगता येत नाही असे म्हटले आहे़
लातुरकरांना सेनेने शासनामध्ये सहभागी व्हावे, असे वाटते़ ६९ टक्के लोकांनी शिवसेनेने विरोधी बाकावर बसण्यापेक्षा सत्ताधारी बाकावर बसावे असे म्हटले आहे़ केवळ ३१ टक्के लोकांनी आता नाही, सेनेने विरोधी बाकावरच बसून विरोधकाची भूमिका वटवावी, असे मत नोंदविले आहे़ ३१ टक्के लोकांनी भाजपा सोबत राहू नये असे मत नोंदविले आहे़
निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतर शिवसेनेची भूमिका युती करण्याबाबत सकारात्मक राहिली आहे़ परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वतंत्र लढण्याचीच होती़ त्यामुळे नैसर्गिक युतीला अडथळा आला़ सरकार बनवितानाही शिवसेनेने दोन पाऊले मागे टाकले आहेत, परंतु भाजपाची भूमिका सकारात्मक नाही़ त्यामुळे युतीचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे मत सर्व्हेक्षणात लोकांनी व्यक्त केले आहे़ एकंदर शिवसेनेच्या भूमिकेमुळे लोकांमध्ये सहानुभूती असल्याचे या सर्व्हेक्षणातून निदर्शनास आले आहे़
भाजपाचे सरकार आरुढ झाले आहे़ शिवसेना सत्तेत जाणार की विरोधात बसणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही़ रोखठोक भूमिका घेऊन सेनेने आता स्पष्ट भूमिका घ्यायला हवी, अशी मतेही सर्व्हेक्षणातून पुढे आली आहेत़

Web Title: Laturkar says BJP's obstacle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.